Maharashtra Vidhansabha Election 2024 : सिंधुदुर्ग बागायतदार संघ लढविणार सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक

Maharashtra Assembly Election: सिंधुदुर्ग बागायतदार संघ सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून त्याबाबतचा ठराव बैठकीत झाला आहे.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg Election News: सिंधुदुर्ग बागायतदार संघ सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असून त्याबाबतचा ठराव बैठकीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काजूसह विविध फळपिकांच्या दराच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक भूमिकेत होते.

जिल्ह्यात काजू बी दर, पीकविमा परतावा, काजू बी आयात शुल्क, काजू बी अनुदान यासह असंख्य विषयांवरून दोडामार्ग, सावंतवाडी आणि इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. अलीकडेच प्रांत कार्यालयासमोर झालेल्या उपोषणात सहाशेहून अधिक बागायतदार सहभागी झाले होते.

Election
Assembly Elections 2024 : भाजपनंतर 'परिवर्तन महाशक्ती', अजित पवार आणि राज ठाकरे यांनी घोषित केले उमेदवार

लोकप्रतिनिधींकडून बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप सर्व शेतकऱ्यांचा होता. त्यातून हक्काचा लोकप्रतिनिधी असावा याविषयावर चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने रविवारी (ता. २०) अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Election
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उमेदवार कोण असेल याकडे लक्ष

या बैठकीला आकाश नरसुले, अशोक सावंत, दिवाकर म्हावळणकर, गुरूनाथ नाईक, जर्नादन नाईक, शिवाजी गवस, सजंय लाड, तुकाराम म्हापसेकर, गोपाळ करमळकर आदी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष श्री. सावंत यांनी सर्व बागायतदारांची मते जाणून घेतली.

बहुतांश बागायतदारांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, शेतकऱ्यांसाठी तळमळीने झगडणारा हक्काचा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. त्यामुळे फळबागायतदार संघाने सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून उमेदवार उभा करावा, अशी मागणी केली. सर्वच बागायतदारांचे या विषयावर एकमत झाले. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com