E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

Aslam Abdul Shanedivan

Pune News : ई-पीक पाहणी काही कारणात्सव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. रविवारी (ता. १५) संपणाऱ्या ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता अंतिम मुदत २३ सप्टेंबरपर्यंत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी महसूल विभागाने दि. १ ऑगस्टपासून सुरुवात केली होती. पण अवकाळी पाऊस, सततच्या शासकीय सुट्ट्या, वीज पुरवठ्यासह तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता आली नाही. त्यातच ई-पिक पाहणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती.

पण आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केली नाही, अशा शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.

याचबरोबर, शासनाने तलाठी स्तरावर देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीची मुदत वाढ झाली आहे. आता आता २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी पीकपाहणी करू शकतील.

इंटरनेटशिवाय पीकपाहणी

नाशिक विभागात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबरपर्यंत १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीकपाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीकपाहणीची नोंद अद्याप झालेली नाही. त्यावरून विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ई-पीकपाहणी करण्यामध्ये काही समस्या उद्भवल्यास (०२०) २५७१२७१२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. तर जेथे इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीकपाहणी नोंदवण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT