E Peek Pahani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाच लाख ६२ हजार हेक्टरवर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Crop Insurance : यंदाच्या खरीप हंगामात परभणी व हिगं ोली जिल्ह्यांत सोमवार (ता. ९)पर्यंत ४ लाख ४२ हजार ६३६ शेतकरी खातेदारांनी ५ लाख ६२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी केली आहे.
E-Peek Pahani
E-Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात परभणी व हिगं ोली जिल्ह्यांत सोमवार (ता. ९)पर्यंत ४ लाख ४२ हजार ६३६ शेतकरी खातेदारांनी ५ लाख ६२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी केली आहे. या दोन जिल्ह्यांत खरिपाचे पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यांच्यात अद्याप मोठी तफावत दिसत आहे. खरीप हंगामातील ई-पीकपाहणीसाठी रविवार (ता. १५) मुदत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात खरिपाची ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टर पेरणी झाली आहे. सोमवार (ता. ९)पर्यंत जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ५२४ शेतकरी खातेदारांनी ३ लाख ७९ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली आहे. त्यात चालू पड क्षेत्र १ हजार ९९७ हेक्टर आहे.

हिगं ोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ५४ हजार ४८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. जिल्ह्यात शेतकरी खातेदारांची संख्या ३ लाख ५७ हजार ३६५, तर शेती खात्यांचे क्षेत्रफळ ४ लाख ५१ हजार ४३३ हेक्टर आहे. सोमवार (ता. ९) पर्यंत मोबाइल अॅपद्वारे १ लाख ४४ हजार ११२ शेतकरी खातेदारांनी व तलाठी स्तरावर १५० मिळून मोबाइल अॅपद्वारे १ लाख ४४ हजार २६२ खातेदारांची १ लाख ८२ हजार ८६५ हेक्टरवरील ई-पीकपाहणी झाली आहे. मोबाइल अॅपद्वारे व तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी मिळून एकूण खात्यांचे क्षेत्रफळ १ लाख ८३ हजार १३ हेक्टर आहे.

E-Peek Pahani
E-Peek Pahani : परभणी जिल्ह्यात रब्बीतील दीड लाख हेक्टरवरील ई-पीकपाहणी

ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीकपेरा नोंदणी प्रक्रियेत कमजोर नेटवर्क तसेच सर्व्हरशी कनेक्ट होण्यास विलंब हे अडथळे दूर करण्यास सर्व संबधिं त दुर्लक्ष करत असल्यामुळे ई-पीकपाहणीची गती संथ आहे. पेरणी क्षेत्र व ई-पाहणी पेरा नोंदणी क्षेत्र यांच्यात अद्याप मोठा फरक आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीकपेरा नोंद करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ई-पीकपाहणीस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणी-हिंगोली जिल्हे ई-पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरममध्ये) तालुका शेतकरी संख्या ई-पीकपाहणी क्षेत्र परभणी ५१७१० ६९१२३ जिंतूर ५२११६ ७१९४८ सेलू ३१२०५ ४१२१६ मानवत २२७९७ ३१०८५ पाथरी २५४३७ ३३०८७ सोनपेठ १९४४६ २४३३३ गंगाखेड ३२२६५ ३८३२६ पालम २७३१९ ३०४३३ पूर्णा ३६२२९ ४०३७९ हिंगोली २५५८९ ३५०७८ कळमनुरी ३१५९० ३९५३९ वसमत ३३०६२ ३७७३२ औंढा नागनाथ २५९९६ ३०२९६ सेनगाव २७८७५ ४०२१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com