Nanded News : नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा. पीककर्ज, पीकविमा, नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी, यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद १५ सप्टेंबरपूर्वी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात आजपर्यंत केवळ तीन लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रानुसार ४८.४१ टक्के पेरा नोंदविला आहे. अद्याप पन्नास टक्क्यांच्यावर शेतकऱ्यांनी पेरा नोंदविला नसल्याची माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यात खरिपामध्ये आठ लाख १४ हजार ३६० हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. पेरणीनंतर दरवर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरावरून पीक पेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शासनाने यंदा एक ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत पेरा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते.
यानुसार शेतकऱ्यांनी कामही सुरू केले. परंतु अद्याप तीन लाख ९४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या पेऱ्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात अर्धेअधिक क्षेत्र बाकी आहे. प्रशासनाने खरीप हंगाम २०२४ साठी क्षेत्रीयस्तरावरून पीकपाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा, माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे,
पीक विमा पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट फोन मोबाइलमधील गूगल प्लेस्टोअरमधून ई-पीकपाहणी ॲप इंन्स्टॉल करत त्यात पीक पाहणी, पेरा नोंद घ्यावी,
काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडल अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवकांनी ई-पीक पेरा पूर्ण करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. परंतु आजपर्यंत केवळ ४८ टक्क्यांनुसार तीन लाख ९४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा पेरा नोंदविण्यात आला आहे.
तालुकानिहाय पीकपेरा नोंदणी (हेक्टरमध्ये) (कंसात टक्केवारी)
नायगाव - २८२९ (५८), माहूर - १३,४८७ (३८), बिलोली - २९,०३९ (६२), किनवट - ३७,७८२ (४७), कंधार - २४,७६३ (३७), मुदखेड - १३,०६३ (४९), हिमायतनगर - २०,२६१ (५५), अर्धापूर १२,२६५ (४३), नांदेड - १४,०२० (४३), देगलूर - ३१,३५१ (५८), उमरी - १७,५५१ (५०), धर्माबाद - १७,९०९ (५८), लोहा - २८,३७६ (३८), हदगाव - ४८,७३९ (५४), भोकर - १८,११० (३५), मुखेड - ३९,१५७ (५०).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.