Bhalchandra Nemade Agrowon
ॲग्रो विशेष

Bhalchandra Nemade : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अस्वस्थ करणाऱ्या

Farmer Issue : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक, ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : क्रांतिकारकांच्या विचारांची मूल्ये समजून घेण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. सध्याचे राजकीय वातावरण हास्यास्पद आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक, ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.

कुंडल येथे बुधवारी (ता. ४) क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. लाड यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. लाड यांच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा क्रांतिअग्रणी पुरस्काराने डॉ. नेमाडे यांना चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते सन्मानित केले. या वेळी आमदार अरुण लाड, प्रतिभा नेमाडे, ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे किरण लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, प्रकाश लाड, उदय लाड आदी उपस्थित होते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. नेमाडे म्हणाले, ‘‘क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेले पत्री सरकार पुन्हा सुरू व्हायला पाहिजे. आमच्या खानदेशात मिळमिळीत क्रांतिकारक होते; परंतु इथं खऱ्या अर्थाने क्रांती केली आहे. औंध संस्थानचे राजे भवानराजे पंतप्रतिनिधी यांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे. आपल्याकडे मराठी भाषा व्यवस्थित शिकवली जात नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. ते भयानक आहे. मराठी भाषेच्या मुळाकडे गेले पाहिजे; पण आपण जात नाही. मराठीचे वैभव आपण टिकवत नाही. ते टिकवले पाहिजे.’’

जब्बार पटेल म्हणाले, ‘‘क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापूंच्या नावाने उभारलेले स्मारक प्रत्येकाने पाहिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते, तर आधुनिक महाराष्ट्र घडला नसता, असे बापू म्हणाले होते. त्याचा प्रत्यय आज येतो.‌’’

आमदार अरुण लाड म्हणाले, ‘‘जी. डी. बापू यांचे विचार चिरंतन राहावेत, यासाठी बापूंच्या नावाने पुरस्कार दिला जातो. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. तुफान सेनेची निर्मिती केली. तो लढा तरुणांना समजावा. यासाठी पुरस्काराचे आयोजन केले जाते.’’ प्रारंभी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. लाड, क्रांतिवीरांगना विजया लाड यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. प्रताप लाड यांनी स्वागत केले. अप्पासाहेब कोरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spice Market: जगातील मसाला उद्योगाची उलाढाल ४१.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

Crop Loss Compensation: निफाडला बाधित शेतकऱ्यांना ४७ कोटी : आमदार बनकर

Soybean MSP Procurement: सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० तारखेपासून नोंदणी सुरु होणार, कमी भावात सोयाबीन न विकण्याचे आवाहन

Agrowon Podcast: कांदा भाव कमीच, कापसाचा भाव दबावातच, गाजराला उठाव, उडदाचे भाव कमीच तर लसणाचे भाव टिकून

Employment Demand: पैसा नको, नोकरी द्या, वारसांना रेल्वेत सामावून घ्या’

SCROLL FOR NEXT