Farmer Issues: शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख देणाऱ्या ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन १२ ते १६ मार्च दरम्यान करण्यात आले होते. प्रदर्शनाची अधिकृत वेळ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत असताना सायंकाळी ७ वाजेनंतरच शासकीय विभागांच्या स्टॉल्सवरून माहिती देणारे बहुतांश अधिकारी व माहिती प्रतिनिधी गायब दिसून आले. कृषी विभागाचा हा विषय असला तरीही शेतकऱ्यांसाठी इतर विभाग देखील महत्त्वाचे असतात. मात्र शेतकऱ्यांप्रती गांभीर्य नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे..जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, आत्मा (नाशिक) आणि ‘माविम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कृषी कुंभ २०२६ प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाच्या उभारणीवर आणि आयोजनावर शासनाचा दोन कोटींवर खर्च झाला. ‘शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान रुजवणे आणि स्पर्धाक्षम बनवणे’ हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. स्टॉलवर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेपर्यंत थांबणे अपेक्षित असताना संबंधित स्टॉलवर माहिती देण्यासाठी ५ नंतर कुणीही नसल्याने रिकामे स्टॉल दिसून आले..Mini Saras Exhibition: मिनी सरस उत्पादने विक्री प्रदर्शन, खाद्य महोत्सव सुरू.माहिती देण्यासाठी शासकीय यंत्रणा व राष्ट्रीयीकृत बँकाचे अधिकारी येथे थांबत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी नियोजन केले. विविध उपक्रमांसह प्रदर्शन देखणे आणि गर्दीने भरलेले झाले. मात्र दिवसाची कामे आटोपून सायंकाळी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या खुर्च्या पाहून माघारी परतावे लागले. सायंकाळी ५ नंतर काही अधिकारी थांबत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली..Livestock Exhibition: डोंगरगाव-खजरी येथे पशुपक्षी प्रदर्शनास पशुपालकांचा प्रतिसाद.शेती, शेतकऱ्यांबाबत गांभीर्य नाही का?अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी शेतीत राबत आहे. त्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त असते. मात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या प्रदर्शनाकडे केवळ एक ‘औपचारिकता’ किंवा ‘ड्यूटी’ म्हणून पाहत आहेत का ? अशी मुद्दा समोर येत आहे. आता हा प्रकार समोर आल्यानंतर चौकशी होणार का? याकडे लक्ष लागले..ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयांना सुट्टी असते, त्याप्रमाणे शनिवार व रविवारी देखील अनेक राष्ट्रीयीकृत बँकाच्या दालनावर संबंधितांची उपस्थिती नव्हती. महसूल, माविम, जिल्हा रेशीम कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कौशल्य विकास केंद्र, कृषी पणन मंडळ, मत्स्यव्यवसाय, वन, वखार महामंडळ, पशुसंवर्धन,मृदा व जलसंधारण, महाबीज, कृषी उद्योग विकास महामंडळ, यासह कृषी विज्ञान व काही सहभागी संशोधन केंद्राच्या संबंधित दालनावर हीच परिस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.