Sugarcane FRP : ऊसदराबाबतची शिरोळमधील बैठक निष्फळ

Sugarcane Season : ‘आंदोलन अंकुश’चे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, भूषण गंगावणे यांनी ऊस उत्पादकांची बाजू मांडताना मागील हंगामातील उसाला प्रतिटन दोनशे रुपयांची मागणी व चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाला ३७०० रुपयांची मागणी केली.
Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP Rateagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ‘आंदोलन अंकुश’ व शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींमध्ये मंगळवारी (ता. ३) झालेल्या बैठकीत चालू गळीत हंगामातील उसाला ३७०० रुपये व मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन दोनशे रुपये दर देण्याबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे धनाजी चुडमुंगे यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले.

तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर, शरद, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, श्री दत्त व गुरुदत्त या कारखान्यांचे प्रतिनिधी आणि ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभागाचे प्रतिनिधी यांची तहसीलदार यांच्या दालनात बैठक झाली.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : ...अन्यथा परिणामास तयार राहा

‘आंदोलन अंकुश’चे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, भूषण गंगावणे यांनी ऊस उत्पादकांची बाजू मांडताना मागील हंगामातील उसाला प्रतिटन दोनशे रुपयांची मागणी व चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाला ३७०० रुपयांची मागणी केली.

या वेळी उपस्थित असलेल्या पाचही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी या दोन्ही मागण्यांबाबत आपल्याला अधिकार नसल्याने ही मागणी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक तीन दिवसांमध्ये घेऊन निर्णय दिला जाईल, अशी भूमिका घेतली.

Sugarcane FRP Rate
Sugarcane FRP : उसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्या

तथापि, या बैठकीत पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडणे, क्रमपाळीनुसार उसाची तोड करणे, क्रमपाळीची यादी प्रत्येक गावामध्ये लावणे, ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्यांकडून खुशाली मागितल्यास त्यांच्यावर कारवाई करणे आदी मागण्या कारखान्याच्या प्रतिनिधींनी मान्य केल्या. याप्रसंगी तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी चुडमुंगे यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले.

दरम्यान, ऊसदराबाबतच्या मुख्य दोन मागण्यांबाबत या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याने चुडमुंगे यांचा ‘अन्नत्याग’ सुरूच राहणार असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, तीन दिवसांमध्ये ऊसदराबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com