Devendra Fadnavis CM Oath Ceremony : आज फडणवीस तिसऱ्यांदा 'मुख्यमंत्री' तर अजित पवार सहाव्यांदा घेणार 'उपमुख्यमंत्रीपदा'ची शपथ; संध्याकाळी ५.३० वाजता शपथविधी

Maharashtra CM swearing-in ceremony updates: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज (गुरुवारी) शपथविधीचा सोहळा होणार आहे. हा सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, And Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, And Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Maharashtra CM Oath : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. दोन आठवड्यांनंतर भाजप विधिमंडळ पक्षाचे गट नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्यानंतर ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील हे निश्चित झाले.

आज मुंबई येथील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधीचा सोहळा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शपथ घेणार असून अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतील. तर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

बुधवारी (ता.४) काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. तसेच या तिघांनी महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला होता.

यानंतर आज शपथविधी होणार असून एकाच जिल्ह्यातील दोन नेते एकाच वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील. एकनाथ शिंदे यांचे मुळ गावं दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) असून अजित पवार यांचे मुळ गाव नांदवळ (ता. कोरेगाव) आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, And Ajit Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा

भव्य शपथविधी

नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य असणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि २६ मान्यवर उपस्थित असतील. यात दोन राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे राज्यातील प्रमुख तीन नेते ज्यात चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे प्रमुख नेते, लोकसभेतील शिवसेना गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व्यासपीठावर असतील. आझाद मैदानात ४० हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असून यात राज्यातील लाडक्या बहिणींचा देखील समावेश आहे. तर ४ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

'या' नेत्यांना निमंत्रण

दरम्यान या सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह आमदार आणि खासदारांना निमंत्रण देण्यात आली आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, And Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference : सत्ता स्थापनेचा महायुतीचा दावा; शिंदेंची भूमिका गुलदस्त्यात, अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी

तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

बुधवारीच भाजपच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली असून ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी २०१४ ते मुख्यमंत्री बनले होते. यानंतर २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी घडवून आणत ते ८० तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर आता २०२४ मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी

आज नव्या सरकारची स्थापना होत असून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. याआधी त्यांनी काँग्रेच्या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. तर २०१९ मध्ये भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

त्यावेळी त्यांना ३ दिवसांत राजीनामा द्यावा लागला होता. ते पुन्हा सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी पुन्हा बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. आता २०२४ मध्ये ते पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त आणि २९ सहायक पोलिस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय, ५२० पोलीस अधिकारी आणि ४ हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com