Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Onion Cultivation : सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रित आहे. मात्र मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकासह कांद्याची रोपे खराब होऊ लागली आहेत.

Team Agrowon

Nashik News : सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रित आहे. मात्र मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकासह कांद्याची रोपे खराब होऊ लागली आहेत. अधिकच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे (उळे) खराब झाल्याने नवीन उळे टाकावे लागत आहे. मात्र आता बियाण्यांची टंचाई झाल्याने बियाण्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे ‘कुणी उळे देता का उळे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कसमादे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने येथील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळी खरीप लाल कांद्याची लागवड करण्यास उशीर झाला असला तरी कांद्याचे वाढते भाव पाहून कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे. ज्यांच्याकडे कांद्याची रोपे आहेत त्यांची लागवड सुरू असली तरी ज्यांची रोपे खराब झाली आणि ज्यांच्याकडे रोपे नाहीत त्यांना मात्र कांद्याची रोपे शोधावी लागत आहेत.

याशिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवड लवकर करण्याच्या उद्देशाने उन्हाळी रब्बी कांदा बियाणे टाकत रोप तयार करण्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. तरी अतिपावसामुळे तो अयशस्वी ठरला आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळ कांद्याचे रोप खराब झाले आहे. मर व बुरशी यांचा प्रादुर्भाव व दव पडून कांद्याची रोपे खराब झाली आहेत.

मागील वर्षी या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना कांदा डोंगळे लावता न आल्याने कांदा बियाण्यांचे (काळे उळे) उत्पादन घेण्यास मर्यादा अल्या. घरात बियाणे नसल्याने कांद्याचे बियाणे विकत घ्यावे लागले. एक महिन्यापूर्वी दोन हजार रुपये किलो मिळणाऱ्या बियाण्यांचे दर आता जवळपास दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.

यामुळे कांद्याचे रोप तयार करण्यासाठी पुन्हा बियाणे विकत घेणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी कर्ज वा उसनवार करून बियाणे घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने महागाचे बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. पाऊस पडल्यामुळे आता कांदा लागवड करायची तयारी असली तरी रोपांची आणि बियाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकरी कांदा रोपाच्या व बियाण्यांच्या शोधात फिरत आहेत.

यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे. मक्याचे पीक करप्याने आणि अतिपावसाने उद्ध्वस्त केले असून कांदा लागवडीसाठी बियाणे आणि रोप नसल्याने सारेच अवघड झाले आहे.
- उद्धव भामरे, खुंटेवाडी, ता. देवळा
बियाणे कंपन्यांनी कांदा बियाणे बॉक्सवर अधिकच्या किमती छापून ठेवल्या आहेत तर विक्रेत्यांनी कांदा बियाण्याची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांना कांदा बियाणे विकले जात आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबवण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. कसमादे पट्ट्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच आता महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
- भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT