Nanded News: मागणीअभावी मुदखेड, अर्धापूर, नांदेड व भोकर तालुक्यांतील हजारो हेक्टरवरील काढणीला आलेली केळी शेतातच उभी आहेत. केळीची झाडेही काढायला परवडत नसल्यामुळे बागायतदार शेतकरी हताश झाले आहेत. परिणामी, केळी उत्पादकांना २०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा फटका बसला आहे. .नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीखालील एकूण क्षेत्र अंदाजे १८ ते २० हजार हेक्टर आहे. यंदा मे व जूनमध्ये या केळीला दोन हजार दोनशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यानंतर जुलैमध्ये देखील दीड हजार रुपयांचा दर होता. या काळात केळी उत्पादकांच्या हातात चांगले पेसे येऊ लागले..Banana Export: केळीचे सुकले बाग!.परंतु नवरात्रानंतर मात्र दरात मोठी घसरण सुरू झाली. केळीला प्रति क्विंटल दोनशे रुपयेही मिळेनासे झाले. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना केळीची झाडे शेताबाहेर काढायलाही परवडेनासे झाले. परिणामी, हजारो हेक्टरवरील केळीची झाडे शेतात काढणीविना उभी आहेत. घड झाडावरच पिकून चालले आहेत..दरम्यान, यंदा जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीचा दर्जा खालावला. सततच्या पावसामुळे रोगराई पसरली होती. परिणामी, उभी झाडे पिकायला सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. वीस रुपये किलोचा दर पडून दोन ते तीन रुपये किलोवर आला आहे. या परिस्थितीत केळी उत्पादकांना २०० ते २५० कोटी रुपये आर्थिक फटका बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे..Banana Crop Loss: दोन एकरांतील केळी पीक कापून टाकले.अतिवृष्टीमुळे खरिपातील हातची पिके गेली असताना, मोठी आर्थिक गुंतवणूक करून केळीवर केलेला खर्चही निघालेला नाही. जून २०२५ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे चार हजार हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली होती. त्यावेळी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली होती..नांदेड जिल्ह्यात २० हजार हेक्टरवर केळीची लागवड करण्यात येते. असे असूनही कोल्ड स्टोअरेजसारख्या पायाभूत सुविधा येथे नाहीत. केळीचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही. मोठ्या शहरातील व्यापारी इथे यायला तयार नाहीत. परिणामी, केळी उत्पादक आज उध्वस्त झाला आहे.हनुमंत राजेगोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.