Monsoon Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Tourism : पर्यटकांच्या त्रासाला कंटाळून ‘बंदी’चा ग्रामसभेचा निर्णय

Pune Monson Tourist Spot : बसरापूर गावाचा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

Team Agrowon

Pune News : भाटघर धरणाच्या किनाऱ्यालगत असलेल्या बसरापूर (ता.भोर) या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत रात्री सात ते सकाळी सातपर्यंत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी गावच्या हद्दीतील धरण परिसर क्षेत्र बंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

या संदर्भात नदीलगतचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन, ठराव तसेच पोलिस पाटील अहवाल भोरचे तहसीलदार सचिन पाटील व भोरचे पोलिस निरीक्षक अण्णा पाटील यांना शुक्रवारी (ता.५) देण्यात आले. या वेळी या गावच्या सरपंच नीलम झांजले, उपसरपंच रामदास झांजले, पोलिस पाटील विठ्ठल झांजले व ग्रामस्थ उपस्थित होते.

बसरापूर गावाचा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्टी दिवशी या भागांत फिरणारे पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रण करणारे, मद्यपी, प्रेमीयुगुले, तरुण -तरुणी, रात्री अपरात्री येत असतात परिसरात तंबू टाकून मुक्काम करतात. रात्री- अपरात्री, उशिरा मद्यसेवन करून हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

यामुळे महिलांना मद्यधुंद असणाऱ्या पर्यटकांचा मोठा त्रास होतो. अनेक जण भांडण तंटा करून दमदाटी करून भरधाव वेगाने वाहने चालवत असतात. यामुळे प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली असल्याने पुढे भविष्यातील धोका लक्षात घेता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री सात ते सकाळी सातपर्यंत या नदीच्या किनाऱ्यावर फिरायला व गावच्या हद्दीतील मागील रस्त्यावरून रात्री सातनंतर नदीला जाण्यासाठी मनाईची मागणी केली असून ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी सांगितले.

ग्रामस्थांचा ठराव व निवेदन प्राप्त झाले असून पोलिस स्टेशनचा अहवाल मागितला आहे. नागरिकांना पर्यटकांच्या होणाऱ्या नाहक त्रासापासून सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.
- सचिन पाटील, तहसीलदार, भोर
नदीकिनारी दिवसा आणि रात्री आमची गस्तीची गाडी नेहमी फिरत असते. कित्येक वेळा अनेकांना आम्ही या ठिकाणाहून हाकलून लावले आहे. ग्रामस्थांचे निवेदन व पोलिस पाटलांचा अहवाल मिळाला असून पुढे वरिष्ठ पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- अण्णा पवार, पोलिस निरीक्षक, भोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Prof. M.S. Swaminathan Award 2024-25 : २०२४-२५ चा स्वामीनाथन पुरस्कार डॉ.चेरुकुमल्ली श्रीनिवास राव यांना जाहीर

Nar-Par Girna Project: नार पार -गिरणा प्रकल्पाबाबत सरकारची अनास्था

Land Preparation: जमीन पूर्वमशागतीला वेग

Banana Care in Rain: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामध्ये केळी बागेचे व्यवस्थापन

Agrowon Podcast: सोयाबीनमधील वाढ कायम; कापूस दरात सुधारणा, गवार तेजीत, गव्हाची आवक वाढली तर डाळिंब तेजीत

SCROLL FOR NEXT