Rural Development: ‘‘ग्रामीण भागातील माती, माणसं, संस्कृती, परंपरा, निसर्ग व खाद्यसंस्कृतीची माहिती भावी पिढीला होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडत असल्याने हा मातीशी नाळ जोडणारा उपक्रम ठरेल,’’ असे उपसंचालक (पर्यटन) विजय जाधव यांनी सांगितले..जागतिक पर्यटन दिनानिमित्त शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी येथे एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालिका मोसमी कोसे, शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. नितीन कोंडे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रा. राजू इस्वाळ, सहायक पर्यटन अधिकारी किरण गाडेकर, शिवाजी गायकवाड, उपलेखापाल राजेश मोहिते यांच्यासह अमरावती विभागातील प्रगत शेतकरी व कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक उपस्थित होते..Argentine Agricultural Cooperatives: अर्जेंटिनातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल .जाधव यांनी कृषी पर्यटन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी उपलब्ध संधींची माहिती दिली. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच महिला उद्योजकांसाठी ‘आई’ योजनेंतर्गत विविध पात्र व्यवसायांसाठी व्याज परतावा योजना राबविली जाते, असे त्यांनी सांगितले..Women Empowerment: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक : प्रभावी अंमलबजावणीची गरज.प्रा. डॉ. नितीन कोंडे यांनी मुलांना माती, निसर्ग, कृषी विज्ञान आणि सजीवांच्या जीवनचक्राची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळू शकते, असे सांगितले. प्रा. राजू इस्वाळ यांनी लोककला, हस्तकला, पारंपरिक वाद्ये व खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याबाबत माहिती दिली..कृषी पर्यटन केंद्रांचा सन्मानयावेळी उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रे व प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मोहन तेजराव जगताप (मामाचं वावर कृषी पर्यटन केंद्र, वळती, ता. चिखली, जि. बुलडाणा), विजय श्रीराव (महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरुड, जि. अमरावती), नागेश कन्नामे (रोअर कृषी पर्यटन केंद्र, जि. यवतमाळ), प्रकाश पोहरे (वेदनंदिनी, कान्हेरी सरप, अकोला) आणि राहुल देशमुख (नेचर ब्लीस कृषी पर्यटन केंद्र, जि. वाशीम) यांचा समावेश होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.