Agriculture Department : फळरोपे, कलमांची दरवाढ

Seedlings and Cutting Price Increase : राज्यातील सरकारी व खासगी रोपवाटिकांमधील व्यवस्थापन खर्चात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे या रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांना विकण्यात येणारी रोपे व कलमांच्या दरांमध्येही वाढ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
Nursery Management
Nursery ManagementAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सरकारी व खासगी रोपवाटिकांमधील व्यवस्थापन खर्चात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे या रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांना विकण्यात येणारी रोपे व कलमांच्या दरांमध्येही वाढ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

विविध फळे व मसाला पिकांचे कलमे आणि रोपांच्या दर निश्‍चितीसाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीची बैठक अलीकडेच कृषी आयुक्तालयात झाली. महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले, फलोत्पादन सहसंचालक अशोक किरन्नळी, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे उपसंचालक ए. के. सिंह तसेच चारही कृषी विद्यापीठांमधील उद्यानविद्या विभागाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

डॉ. मोते यांनी सांगितले, की सुधारित दराने लागवड साहित्याची विक्री करण्यास रोपवाटिकांना तत्काळ म्हणजेच मंगळवारपासून (ता. २) मान्यता देण्यात आली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांमधून होणाऱ्या सर्व फळ लागवडीसाठी आता सुधारित दर लागू असतील.

विदेशातून आयात होणाऱ्या, विद्यापीठांची शिफारस नसलेल्या तसेच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होणाऱ्या विविध वाणांच्या फळबागा राज्यात वाढत आहेत. या बागांची निरीक्षणे घेतली जावीत, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. राज्यात पानपिंपळी, लेंडीपिंपळी पिकाला कृषी विद्यापीठांमधील संशोधनात प्राधान्य मिळावे, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो, खजूर, स्ट्रॉबेरी व इतर बेरी वर्गीय फळपिकांचे संशोधन वाढवावे, त्याचे चाचणी अहवाल विद्यापीठांनी फलोत्पादन संचालनालयाला सादर करावे, असे समितीने सूचित केले आहे.

Nursery Management
Distribution of Seedlings, Inputs : केळी संशोधन केंद्रात रोपे, निविष्ठांचे वितरण

...असे आहेत कलमे, रोपांचे सुधारित दर

फळपिकाचे नाव…नवे विक्रीदर (रुपये प्रतिनग)

आंबा कलमे …९०

आंबा कलमे (दोन वर्षांवरील) …२००

काजू कलमे …७०

काजू कलमे (दोन वर्षांवरील) …१५०

चिकू कलमे …१००

चिकू कलमे (दोन वर्षांवरील) …२००

पेरू कलमे …६०

डाळिंब कलमे …३०

संत्रा कलमे पिशवीतील (जंबेरी मूळकांडावरील)…७०

संत्रा कलमे पिशवीतील (रंगपूर मूळकांडावरील)…८०

संत्रा कलमे पिशवीविरहित (जंबेरी मूळकांडावरील)…६०

संत्रा कलमे पिशवीविरहित (रंगपूर मूळकांडावरील)…७०

मोसंबी कलमे पिशवीतील (जंबेरी मूळकांडावरील)…७०

मोसंबी कलमे पिशवीतील (रंगपूर मूळकांडावरील)…८०

मोसंबी कलमे पिशवीविरहित (जंबेरी मूळकांडावरील)…६०

मोसंबी कलमे पिशवीविरहित (रंगपूर मूळकांडावरील)…७०

Nursery Management
Agriculture Department : राज्याला अखेर मिळाला पूर्णवेळ कृषी आयुक्त

सीताफळ कलमे - ५०

कागदी लिंबू रोपे पिशवीविरहित…३०

कागदी लिंबू रोपे पिशवीतील…४०

आवळा कलमे …५५

आवळा रोपे …२५

चिंच कलमे (विकसित जाती) …८०

कोकम कलमे …५०

लिची रोपे–३०

फणस कलमे …६०

लिची कलमे …२५

अंजीर कलमे …५०

जांभूळ कलमे स्थानिक…२५

जांभूळ कलमे बहाडोली - ८०

करवंद कलमे …५०

नारळ रोपे (बाणावली व इतर) …१२०

नारळ रोपे (टी×डी)…१५०

नारळ रोपे पिशवीतील…२५०

सुपारी रोपे …४०

पिशवीतील इतर रोपे (सीताफळ, चिंच, जांभूळ,फणस, जायफळ, आंबा)…३०

तेलताड रोपे …५०

बांबू रोपे–४०

डॉग्रीज रोपे द्राक्षासाठी…२०

जंबेरी रोपे …२०

खिरणी रोपे …३०

मिरी रोपे …२५

दालचिनी कलमे …४०

लवंग रोपे …३५

जायफळ कलमे …७०

कलम कांड्यांचे दर असे...

आंबा- १०

संत्रा, मोसंबी- १०

बोर, चिकू, काजू - ८

चिंच,आवळा …८

पानपिंपरी व पनवेल (३ डोळे व ९ इंची) -३

ड्रॅगन फ्रूट कटिंग - ३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com