Maharashtra Tourist Spot : पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Monsoon Tourism : जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाळा सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. तसेच भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते.
Monsoon Tourism
Monsoon TourismAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाळा सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. तसेच भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत.

Monsoon Tourism
Monsoon Session 2024 : शेती क्षेत्रावरील खर्चात १५ टक्क्यांची कपात

मावळ तालुक्यातील भुशी धरण, गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर,

मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा,

Monsoon Tourism
Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटिंग क्षेत्रात हे आदेश लागू असतील.

थोडक्यात महत्त्वाचे...

- पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध

- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध

- या आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com