Market Bulletin: सोयाबीनचे दर कायमराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी आज लातूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ३४७ क्विंटलने घटून २ हजार १२४ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दरात ७० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ६ हजार १२० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, उदगीर बाजारात सोयाबीनची आवक कालइतकीच १७० क्विंटल राहिली असून, सरासरी दरात १५२ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ६ हजार ७१ रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, तुळजापूर बाजारात सोयाबीनची आवक ८० क्विंटलने वाढून १५५ क्विंटल झाली असून, सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल होता..कांद्याचे दर तेजीतचपिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कालच्या तुलनेत १ हजार ८ क्विंटलने घटून ११ हजार २५० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल होता. लासलगाव बाजारात कांद्याची आवक २ हजार २९३ क्विंटलने घटून ४ हजार ६०५ क्विंटल झाली, तर सरासरी दर ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. तसेच, येवला बाजारात कांद्याची आवक आणि सरासरी दर कालच्या तुलनेत आजही स्थिर होता. आवक ४ हजार क्विंटल झाली असून सरासरी दर ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता..US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी.टोमॅटोच्या बाजाराच चढ-उतारआज पनवेल बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत १५ क्विंटलने वाढून ७२५ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर, चंद्रपूर-गंजवड बाजारात टोमॅटोची आवक ५६ क्विंटलने घटून आज ३६० क्विंटल झाली. सरासरी दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. तर, कोल्हापूर बाजारात टोमॅटोची आवक १२४ क्विंटलने वाढून २९८ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात १०० रुपयांची घट होऊन आजचा दर ९०० रुपये प्रति क्विंटल राहिला..Fish Rate: मासळीच्या दरात सुधारणा; पापलेट १२००, सुरमई १००० रुपये किलो; आवकेत घट.मेथीच्या दरात तेजीराज्यातील छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत २ हजार ३०० नगांनी वाढून आज ९ हजार १०० नग झाली होती. मात्र, सरासरी दर १ हजार २५० रुपये प्रति नगावर स्थिर होता. तर, श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक परवाच्या तुलनेत ५०० नगांनी वाढून ६ हजार ४०० नग झाली असून, सरासरी दरात २ रुपयांची वाढ होऊन आजचा दर १७ रुपये प्रति नग राहिला. तसेच, अकलुज बाजारात मेथीची आवक ५०० नगांनी घटून आज २ हजार २५० नग झाली, तर सरासरी दर १५ रुपये प्रति नगावर कायम होता..केळीच्या आवकेत बदलनाशिक बाजारात भुसावळी केळीची आवक कालच्या तुलनेत २२० क्विंटलने वाढून ३४० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर १ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर, पुणे बाजारात केळीची आवक २९ क्विंटलने घटून ३८ क्विंटल झाली असून, सरासरी दरात २०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटल झाला. तर, नागपूर बाजारात लोकल केळीची आवक २० क्विंटलने घटून २२ क्विंटल झाली, मात्र सरासरी दर ५२५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.