Galmukt Dharan Galyukta Shiwar Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan Galyukta Shiwar Scheme : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना कायमस्वरूपी राबविणार

Team Agrowon

Mumbai News : राज्यात सध्या सुरू असलेली ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना कायमस्वरूपी राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी (ता.४) मान्यता देण्यात आली. यासाठी २६०४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून, यापुढे गाळ वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. दहा वर्षे जुन्या जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या दोन्ही योजनांसाठी नवीन धोरणास मान्यताही देण्यात आली.

नव्या योजनेचे धोरण निश्चित करण्यात आले असून या आधी गाळ काढून देण्याचे काम शासनामार्फत होत होते. मात्र, गाळ शेतकऱ्यांना वाहून न्यावा लागत होता. यापुढे प्रतिघनमीटर ३५ रुपये ७५ पैसे गाळ वाहतुकीसाठी एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत आणि जास्तीत जास्त ३७ हजार ५०० अडीच एकरापर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी यंत्रसामग्री आणि इंधन यासाठी प्रतिघनमीटर ३१ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या दोन्ही योजनांसाठी पुढील पाच वर्षांसाठी २६०४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी २००४, तर नाला खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी शासन आदेश काढण्यात आला होता. मात्र, वित्तीय तरतुदीसाठी मंत्रिमंडळांची मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेतला. एप्रिल २०२३ पासून ४७९ जलाशयांतून ८० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ सहा हजार शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात आला. त्यासाठी ४३ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२३६ जलाशयांतून ३ कोटी घनमीटर गाळ काढून तो २५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात पसरला. त्यापोटी ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

योजनेसाठी तरतूद

वर्ष तरतूद (गाळमुक्त) नाला खोलीकरणासाठी

२०२४-२५ : ३०० १०

२०२५-२६ : ५०१ ११०

२०२६-२७ : ६०१ १२०

२०२७-२८ : ३०१ १३०

२०२८-२९ : ३०१ १४०

एकूण २००४ ६००

दृष्टिक्षेपात...

१० वर्षे जुन्या जलसाठ्यांची संख्या : ११ हजार ९४८

साठवण क्षमता : ५८. ९५ कोटी घनमीटर

सिंचन क्षमता : १९६०४२३ घनमीटर

अंदाजे गाळाचे प्रमाण : ४४ कोटी घनमीटर

प्रतिवर्षी गाळ काढणे शक्यता : ८. ८० कोटी घनमीटर

प्रतिवर्षी अंदाजित खर्च : ४०० कोटी

एकूण आर्थिक भार : २००४ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT