Kolhapur Flood Control
Kolhapur Flood Controlagrowon

Kolhapur Flood Control : पंचगंगेसह ४ नद्या होणार गाळमुक्त; महापूर नियंत्रणासाठी उपाययोजना, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Collector Amol Yedage : मात्र गाळ काढलेल्या जागा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
Published on

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांचा गाळ कधी काढणार याबाबत वारंवार चर्चा व्हायची दरम्यान याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नद्यांमधील गाळ काढण्याची मोहीम जलसंपदा आणि आपत्ती निवारण विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे. यामध्ये पंचगंगा, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि वेदगंगा या ४ नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नद्यांमधून काढलेला गाळ कोठे टाकायचा, याची निश्चिती झाल्यावर याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल.

याबाबत काल (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यामध्ये गाळ टाकण्याच्या जागांची पाहणी करावी आणि त्यानंतर आर्थिक खर्चाचा आराखडा तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत दिले.

नद्यांमधील गाळ काढावा, अशी मागणी वर्षांनुवर्षे होत आहे. महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेमध्येही नद्यांमधील गाळा काढावा, असे सांगण्यात आले आहे. या सर्वांचा विचार करून जलसंपदा आणि आपत्ती निवारण विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे.

यासाठी नदीपात्रातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत; मात्र गाळ काढलेल्या जागा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. गाळ टाकण्याची ठिकाणी ब्ल्यू किंवा रेड पूररेषेमध्ये नसावीत टाकलेल्या गाळाचा त्रास कोणालाही होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.

Kolhapur Flood Control
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू

गाळ टाकण्याची ठिकाणे निश्चित झाल्यावर गाळ काढण्याचा प्रस्ताव बनवून तो शासनाला पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नदीमधील गाळ काढल्यामुळे नदीपात्रात पाणी साठण्यासाठी सखल भाग तयार होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात यामध्ये पाणी साठून राहील. 'त्याचा उपयोग त्या काळात करता येणार आहे.

या बैठकीला महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जलअभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदा कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अधिकार उपस्थित होते.

असा काढणार गाळ

संबंधित नदीच्या जिल्ह्यामधील पात्रात काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ही ठिकाणे नदीच्या पात्रात सर्वत्र नाहीत. नदीची परिस्थितीकी (इको सिस्टीम) लक्षात घेऊन स्थान निश्चित करण्यात आले आहे. नदीमधील जलचर, पाणवनस्पती आणि पात्राची भौगोलिक स्थिती यांचा विचार करूनच ठिकाणे ठरविण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com