Galmukt Dharan Scheme : ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत २.९५ लाख घनमीटर गाळ उपसा

Government Scheme : परभणी जिल्ह्यातील स्थिती; २३ तलावांतील गाळ ७०० एकरांवर पसरवला
Galmukt Dharan Yojana
Galmukt Dharan Yojana Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Galmukt Dharan : परभणी ः गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत यंदा परभणी जिल्ह्यातील २३ तलावांतील २ लाख ९५ हजार २९९ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५०९ शेतकऱ्यांच्या ७०० एकर क्षेत्रावर गाळ पसरविण्यात आला आहे.

या अंतर्गत अनुदान देण्यासाठी ३ कोटी ३५ लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना परत सुरू करण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग, सार्वजनिक व खासगी भागीदारी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ही योजना राबविली जात आहे. संबंधित गावातील तलावातील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर अशासकीय संस्था नियुक्त केली जाते.

गाळ उपसण्यासाठी यंत्रसामग्री अंदाजे खर्च प्रतिघनमीटर १.३० रुपये व इंधनावरील खर्च प्रतिलिटर ११० रुपये शेत जमिनीवर पसरविण्यात आलेल्या गाळासाठी प्रतिघनमीटर ३५ रुपये ७५ पैसे नुसार एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये ४०० घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

Galmukt Dharan Yojana
Galmukt Dharan Scheme : ‘गाळमुक्त’मधून ५८७ एकर क्षेत्रावर पसरला गाळ

त्यासाठी विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प, अल्पभूधारक असा प्राधान्यक्रम ठरविण्यात येतो. या योजनेअंतर्गत यंदा परभणी जिल्ह्यातील ६६ जलसाठ्यातील गाळ उपसण्यासाठी अर्ज आले होते. एकूण ४२ अर्जांना तांत्रिक मान्यता देण्यात आली.

त्यातून ५ लाख २६ हजार ४५० घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे प्रस्तावित होते. प्रत्यक्षात २३ जलसाठ्यांतून २ लाख ९५ हजार २९९ घनमीटर गाळाचा उपसा करून ५०९ शेतकऱ्यांच्या ७०० एकरांवर पसरविण्यात आला.

Galmukt Dharan Yojana
Galmukta Dharan : शेतकरी गटाच्या प्रयत्नांमुळे नांदखेडा धरण गाळमुक्त

गाळाचा उपसा करण्यात आलेल्या तलावामध्ये भोगाव (ता. परभणी) येथील पाझर तलाव, नवहाती तांडा, सावरगाव, देवगाव, बेलुरा, वाडी, पोखर्णी तांडा, धमधम, चाराठाणा, जांब खुर्द, भिलज, चिंचोली काळे, करंजी, कोरवाडी (सर्वता. जिंतूर), नरसापूर, तांदुळवाडी (सर्व ता. सेलू),

बोथी, काड्याची वाडी, घटांग्रा, बोर्डा, वागदरी (सर्व ता. गंगाखेड), फत्तू नाईक तांडा, बनवस, आडगाव (सर्व ता. पालम) या तलावांचा समावेश आहे. वडाळी (ता.जिंतूर), निरवाडी, नांदगाव-देवगाव (ता. सेलू), डोंगरजवळा (ता. गंगाखेड) येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com