Crop Loss: मे महिन्यातील अवेळी पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील तब्बल ८८४४.७७ एकर क्षेत्रातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने ३३४० शेतकऱ्यांसाठी ९६.७३ लाखांची भरपाई मंजूर केली असली, तरी ई-केवायसी प्रक्रियेत अडकल्याने मदतीचा लाभ अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही.