Katepurna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Katepurna Dam : ‘काटेपूर्णा’चे चार दरवाजे उघडले

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपूर्णामध्ये मागील आठवडाभरात जोरदार साठा वाढला असून अपेक्षित पातळी गाठल्याने या धरणाचे शुक्रवारी (ता. २) चार गेट ३० सेंटीमिटरने उघडून विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील काटेपूर्णा या प्रमुख धरणाच्या क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने साठा वाढला. या प्रकल्पात सध्या ७३.३२२ दलघमी साठा निर्माण झाला असून एकूण साठ्याच्या ८४.९१ टक्क्यांपर्यंत ही पातळी पोचली.

ऑगस्ट महिन्यातील अपेक्षित जलसंचय पातळी ओलांडल्याने याप्रकल्पातून शुक्रवारी चार गेट ३० सेंटीमिटरने उघडून प्रतिसेंकद ९२.२३ घनमीटर एवढा विसर्ग केला जात आहे. अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हा सर्वात मोठा व प्रमुख प्रकल्प आहे. याप्रकल्प क्षेत्रात आजवर ४२५ मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामुळे जुलैत धरणातील साठा झपाट्याने वाढला. सुमारे ६० टक्के धरण या महिन्यात भरले. यामुळे आता पावसाचे पुढील दोन महिन्यांचा कालावधी पाहता प्रकल्पातील साठा नियंत्रित प्रमाणात ठेवण्यात येत आहे. सध्याच्या साठ्याची स्थिती पाहता हा प्रकल्प यंदा लवकरच १०० टक्के पातळी गाठेल अशी शक्यता आहे.

‘वाण’ही वाढीच्या मार्गावर

जिल्ह्यातील ‘वाण’ या प्रकल्पाच्या साठ्यातही आता वाढ होऊ लागली. या प्रकल्पाचे क्षेत्र हे सातपुड्यात असून तिकडे सतत पाऊस होत आहे. या पावसाचा फायदा वाण प्रकल्पाच्या साठ्यात वाढ होण्यास झाला. शुक्रवारी (ता.दोन) सकाळपर्यंत ४०.९१ टक्के साठा तयार झाला होता. या आठवड्यात वाण प्रकल्पाचा साठा वाढीला लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Marathwada Rain : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

Cotton Production : कापूस परिषदेत घटते क्षेत्र, उत्पादकतेवर चिंता व्यक्त

PDKV Shiwarferi : शिवारफेरीत गर्दीने प्रक्षेत्र फुलले

Maize Crop Issue : मक्यावर ‘सुकवा’; कणसात दाणेही अपरिपक्व

SCROLL FOR NEXT