Bhandardara Dam
Bhandardara DamAgrowon

Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून सोडला ४ हजार ७११ क्युसेकने विसर्ग

Nagar Rain : सध्या भंडारदरा धरणातून ४७११ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
Published on

Nagar News : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील जोरदार पावसामुळे भंडारदरा धरण यंदा दहा दिवस आधीच भरले आहे. सध्या भंडारदरा धरणातून ४७११ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात जात असल्यामुळे निळवंडे धरणही ५९ टक्के भरले आहे.

नगर जिल्ह्यातील अन्य भागात पावसाची प्रतीक्षा असली तरी अकोले तालुक्यात मुळा, भंडारदराच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरण हे साधारण १० ऑगस्टच्या दरम्यान भरत असते.

Bhandardara Dam
Nagar Urban Bank : बँक बुडवणार्‍यांवर जबाबदारी निश्चिती करा; केंद्रीय सहकार मंत्रालयाचे आदेश

त्यानंतर साधारण ९५ टक्के पाणीसाठा नियंत्रित ठेवून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. १५ सप्टेंबरपर्यंत धरणातून विसर्ग सुरू राहतो. यावर्षी मात्र हे धरण भरल्याचे अधिकृतपणे तांत्रिकदृष्ट्या जाहीर केलेले नसले तरी धरणातील ९५ टक्के पाणीसाठा नियंत्रित ठेवून ४७११ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

Bhandardara Dam
Nagar Rain Update : नगरच्या बहुतांश भागात दमदार पाऊस

अकोले तालुक्यातील आढळा धरणही ९८ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणाकडे जात असल्यामुळे हे धरणही ५९ टक्के भरले आहे. हरिचंद्र गड परिसरातील जोरदार पावसामुळे मुळा धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुळा नदीतून ६२६० क्यूसेकने पाणी आवक सुरू होती. यंदा आतापर्यंत भंडारदरा धरणात साडेदहा टीएमसी, मुळा धरणात ११ टीएमसी, तर निळवंडे धरणात सव्वाचार टीएमसी पाणी जमा झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com