Panchganga River : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, धरण परिसरात धुवाधार पाऊस

Panchganga River Water Level : दिवसभरात पंचगंगा नदी धोक्याच्या खाली ४२ फूट ४ इंचांवर वाहात आहे. आज दिवसभरात पुन्हा दोन इंचाने वाढ झाली आहे.
Panchganga River
Panchganga Riveragrowon
Published on
Updated on

Panchganga River Water Level Rises : तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून पुन्हा धरणक्षेत्रासह जिल्ह्यात धुवाधार हजेरी लावली. यामध्ये थोडा दिलासा म्हणजे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद होऊन तीन दरवाजांमधून ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात २ इंचाने वाढ झाली.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप पाणी उतरलेले नाही. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही. आलमट्टी धरणातून ३ लाख २५ लाख विसर्ग कायम आहे तर कोयना धरणातून ४० हजार क्युसेकने असलेला विसर्ग वाढवून ५० हजार करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातीलही विसर्ग वाढविला आहे.

पावसाचा जोर गेल्या तीन दिवसांपासून ओसरला होता. परंतु, काल रात्री धरणक्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. दिवसभरात पंचगंगा नदी धोक्याच्या खाली ४२ फूट २ इंचांवर वाहत होती. आज दिवसभरात पुन्हा दोन इंचाने वाढ झाल्याने ४२.४ इंच झाली.

अद्याप अनेक ठिकाणी पावसाचे पाणी पसरले आहे. त्यामुळे एकूण ९३ मार्ग आणि ७३ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ५७ लाख ३९ हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

Panchganga River
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, सरपंच पतीसह ७ जण गेले वाहून

जिल्ह्यात एकूण ९३ मार्ग आणि ७३ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ५७ लाख ३९ हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ८.२८, तुळशी ३.२९, वारणा २९.६४, दूधगंगा २२.३२, कासारी २.३६, कडवी २.५२, कुंभी २.४४, पाटगाव ३.७२, चिकोत्रा १.४९, चित्री १.८९, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.२४, सर्फनाला ०.४८ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com