Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : कृषी विद्यापीठांचे अस्तित्वच शेती, शेतकऱ्यांवर अवलंबून

Agriculture University : कृषी विद्यापीठाचे अस्तित्वच शेती आणि शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. याची जाणीव कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने ठेवावी.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी विद्यापीठाचे अस्तित्वच शेती आणि शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. याची जाणीव कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने ठेवावी. त्यामुळे कृषी विषयक ज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोचविण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या ७४ व्या बैठकीचे आयोजन रब्बी हंगामाच्या अनुषंगाने सोमवारी (ता. ९) राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात करण्यात आली होते. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्र मणी बोलत होते.

कुलगुरू डॉ. मणी म्हणाले, की यंदा १६ हजार क्विंटल बियाणे उत्पादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ करते आहे. लातूर, बदनापूर येथील प्रक्रिया केंद्र लवकरच सुरू होतील. विद्यापीठाने स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या वापर वाढविल्याने खर्चात ४० लाखांची बचत करणे शक्य झाले.

विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पायाभूत सुविधा वाढविण्यावर आमचा भर सुरू आहे. बारावी सीड काँग्रेस छत्रपती संभाजीनगरला घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणारे शेतकरी प्रशिक्षण केंद्र प्रक्रिया विषयाला धरुन असणार आहे.

प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी व शेतकरीही विभागीय कृषी संशोधन सल्लागार समितीच्या यापुढील बैठकीत त्यांनाही सहभागी करून घेतले जाणार, असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्ताविक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार यांनी केले. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे व लातूरचे साहेबराव दिवेकर यांनी खरिपातील काही समस्यांचा ऊहापोह करून रब्बीतील नियोजन व उद्भवू शकणाऱ्या समस्यांची मांडणी केली.

सगुणा राईस तंत्रज्ञान शेतकरी हितासाठी वाढविण्याकरता विद्यापीठाला संशोधनाची आग्रही गरज असल्याची डॉ. मोटे यांनी सांगितले. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधनाची दिशा, गरजांवर आधारित संशोधनाची वाटचाल, त्यासाठीचे विविध प्रस्तावित प्रकल्प त्यांची सद्यःस्थिती, संशोधनातील विद्यापीठाचे कर्तृत्व यावर प्रकाश टाकला.

कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे म्हणाले, की वातावरणातील बदल हा प्रमुख भाग आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ३५ टक्के पाऊस कमी आहे. कमी पावसाच्या काळात पिकावर येणाऱ्या प्रमुख कीड रोगांची माहिती आणि त्यावरील नियंत्रणाचे उपाय काय असावेत ते विद्यापीठांनी सुचवावे. यावेळी घडी पत्रिका व भित्तिपत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन साहाय्यक शीतल कांबळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT