Agriculture Irrigation : ‘पोपटखेड’चे ‘ओव्हर फ्लो’ पाणी पणज प्रकल्पात सोडा

Latest Agriculture News : शेतीच्या सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे प्रकल्पाचे पाणी द्या तसेच पोपटखेड प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी पणज धरणामध्ये सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Akola News : शेतीच्या सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे प्रकल्पाचे पाणी द्या तसेच पोपटखेड प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी पणज धरणामध्ये सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित विभागासह या भागाच्या आमदारांना याबाबत सविस्तर निवेदन दिले.

शेतकऱ्यांनी म्हटले की, पणज प्रकल्प (शहापूर बृहत प्रकल्प) २०१७-१८ मध्ये पूर्ण झाला असून मागील काही वर्षांत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध झाला. या प्रकल्पाचा लाभ पणज, वडाळी देशमुख, चंडिकापूर, देऊळगाव, दिवठाणा, मंचनपूर, सावरा, रंभापूर, धामणगाव, वडगाव मेंढे आदी गावांना होता. या गावातील भूगर्भ पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेती आता निसर्गावर अवलंबून आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘डिंभे’ची पाणीपट्टी भरून हक्क शाबूत ठेवा

तीन वर्षांपासून हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीच्या आशा पल्लवित करीत आहे. परंतु शासनाद्वारे सिंचनाच्या सोयीबद्दल काहीच हालचाली दिसून येत नाहीत. सर्व गावांतील शेतीला लवकरात लवकर जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे.

तसेच पणज या धरणाची साठवण क्षमता जास्त आहे व यामध्ये येणारा पाण्याचा प्रवाह फार कमी आहे. हे धरण काळ्या मातीत असल्यामुळे पाण्याचा निचराही जास्त होतो. या धरणामध्ये येणाऱ्या नद्यांवर अंबाडी, बेलढाक, भिलखेड, चिंचपाणी, खिरकुंड हे सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शिरसाईच्या पाण्यासाठी आजपासून उंडवडीत उपोषण

आधी हे प्रकल्प भरल्यानंतर यावरील ओव्हर फ्लोचे पाणी पणज धरणात येते. २०१९-२० मध्ये सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसात पणज धरण भरले होते. पावसाळा कमी झाल्यास हा प्रकल्प भरत नाही. यावर्षी हिच स्थिती बनली आहे. सध्या केवळ २५ टक्के साठा आहे. या प्रकल्पाच्या दक्षिणेस पोपटखेड धरण आहे. या धरणावरील नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पोपटखेड लवकर भरते व ओव्हर फ्लो (सांडवा) होत राहतो.

या प्रकल्पाचा सांडवा दोन ते तीन महिने वाहतो. हे पाणी पणजमध्ये टाकल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. प्रकल्प भरण्याची समस्या दूर होईल. पोपटखेड प्रकल्पाचा कालवा व पणज प्रकल्प हे केवळ दोन किलोमीटर अंतर आहे.

या दोन्ही मागण्यांवर विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सावरा सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन महल्ले, भाजप तालुकाध्यक्ष राजेश रावणकार, सरपंच स्वाती योगराज मोरे, धीरज गीते, मोनिका मालवे, गजानन यरोकार, प्रवीण सिंगाडे, संजय खलोकर, निर्मल चौधरी, सुवर्णा चौधरी, प्रमिला अढाऊ, राजकुमार खंडेराय, विलास मेंढे, पूजा गहले, विजयकुमार भेले, माया शेंडे, कविता वालशिंगे, देवानंद डोबाळे, दत्ता चौधरी, सागर गहले, गोपाल मोहोड, भास्कर वालशिंगे आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com