Akola News : पूर्वी गावात बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. परिणामी गावातील पैसा गावातच राहत होता. मात्र काळाच्या ओघात गावातील पैसा शहरात जात असून, शहरातून पैसा परत गावात आणण्यासाठी आता एकात्मिक शेती पद्धतीसह समूहाने कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत आदर्श गाव निर्मिती प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील अतिदुर्गम चेलका गावाची निवड होत केली आहे. प्राथमिक सर्वेक्षण व इतर बाबी पूर्ण करीत या गावकऱ्यांच्या उपस्थितीत आदर्श गाव निर्मितीसाठी दत्तकविधान सभा घेण्यात आली. या वेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
शाश्वत विदर्भ विकासासाठी आदर्श गाव प्रकल्पाची अंमलबजावणी गरजेची असून, या कृषी विद्यापीठातंर्गत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एका गावाची निवड करीत कृषी, पशुसंवर्धन, महसूल, जिल्हा परिषद यांसह आर्थिक, सहकारी, सेवाभावी संस्थांच्या प्रयत्नातून गावातील प्रत्येक कुटुंबाचा व पर्यायाने गावाचे आर्थिक स्रोत शाश्वत करण्यासाठी तीन वर्षांत गावात प्रयत्न केले जातील.
शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच अरविंद जाधव यांनी सहकार्याचे आश्वासन दिले. आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, पाणी फाउंडेशनचे समन्वयक संघपाल वाहूरवाघ, श्री सरकटे यांनी मनोगत व्यक्त केले.
उपसरपंच शोभाताई जाधव, उज्ज्वल बोलवार, रामेश्वर उंडाळ, डॉ. उमेश चिंचमलातपुरे, डॉ. सुहास मोरे, प्रा. संजीवकुमार सलामे, डॉ. प्रकाश घाटोळ, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. किशोर बिडवे, सचिन महातळे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.