MPSC Exam Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Exam Schedule : ‘एमपीएससी’च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, २०२४ मध्ये प्रलंबित राहिलेल्या बहुतांश परीक्षा २०२५ मध्ये होणार असल्याचे दिसून येत आहे.

‘एमपीएससी’तर्फे नागरी सेवा परीक्षेच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. हा बदल २०२५ च्या परीक्षेपासून लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुन्या पद्धतीनुसार २०२४ ची परीक्षा शेवटची असेल.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२४ यंदा १ डिसेंबरला घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मार्चपर्यंत जाहीर होईल. यानंतर एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून मुख्य परीक्षेला पात्र उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा १ डिसेंबर २०२४ रोजी होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी,

राज्य सेवा मुख्य परीक्षा २६ ते २८ एप्रिल २०२५ रोजी, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा १० ते १५ मे २०२५ रोजी होणार आहे. सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT