SSC Exam : दहावीची परीक्षा झाली आणखी सोपी

Exam Update : एसएससी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.
Students
StudentsAgrowon
Published on
Updated on

Wardha News : एसएससी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे.

Students
Exam Success Story : शेतकऱ्याची मुलगी झाली तंत्र अधिकारी

हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र, अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते.

Students
Washi APMC : वाशी बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी प्रतिकिलो ४५० रुपये

त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो, पण पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळविल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.

फार पूर्वी एका विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला संपूर्ण विषयाची परीक्षा द्यावी लागत होती. त्यानंतर काही विषयात नापास झाल्यास त्याला दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी मिळू लागली. आता पुन्हा तडजोड करीत ३५ टक्के पेक्षा कमी गुण असल्यास अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा राहणार नाही. शाळा, महाविद्यालये ही राजकीय नेत्यांची आहेत. पटसंख्या कमी झाल्यास अनुदान मिळणार नाही, ही शक्यता लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेशी ही तडजोड करण्यात आली आहे असे वाटते.
डॉ. संजय खडककार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ
गणित आणि विज्ञानाचा पाया भक्कम असेल तरच अनेक क्षेत्रात यशस्वी होता येणार आहे. त्यामुळेच यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणात तशी तरतूद करण्यात आली होती. आता ही एक प्रकारची तडजोड ठरणार आहे. यातून शैक्षणिक दर्जा खालावणार आहे.
डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com