Kolhapur Jaggery Industry: कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ बाजाराला अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कडक कारवाईची व व्यापाऱ्यांच्या बहिष्काराची मोठी झळ बसली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील मुख्य बाजारपेठांमधील गुळाची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली असून, कारवाईच्या धसक्यामुळे सौदे संपूर्ण कोलमडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनच थांबवले आहे..अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सध्या राज्यात भेसळीच्या विरोधात अत्यंत आक्रमक मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळे सांगली बाजार समितीत होणारे गुळाचे सौदे सलग काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहेत. ‘एफडीए’च्या धसक्यामुळे गुजरातसह मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमधील प्रमुख खरेदीदारांनी कोल्हापूर व सांगलीच्या गुळाची मागणी पूर्णपणे थांबवली आहे. कर्नाटकातूनही या दोन्ही बाजारपेठात गूळ यायचा बंद झाल्याने बिगर हंगामात होणारे सौदै पूर्णपणे ठप्प झाले आहेत..Kolhapur Jaggery Market: कोल्हापूर बाजार समितीत उसाअभावी गूळ आवक घटली.कोल्हापुरात आठ दिवसांपर्यंत एक दिवसाआड तीन ते चार हजार गूळ रव्यांची आवक होत होती. पण कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने ही आवक थांबली. गूळ तयार करताना काही गुऱ्हाळ घरांमध्ये कृत्रिम रंग व साखरेचा वापर केला जातो. लॅब तपासणीत ही बाब आक्षेपार्ह ठरल्यास भेसळीचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने अनेक गूळ उत्पादकांनी गूळ उत्पादनच बंद केले आहे..Jaggery Rate: नीरा बाजार समितीत गुळाला ४५२५ रुपये दर.सांगली बाजाराची मोठी भिस्त कर्नाटकातून येणाऱ्या गुळावर असते. मात्र महाराष्ट्राच्या सीमेवर आणि बाजारपेठेत सुरू असलेली कडक तपासणी पाहून कर्नाटकातील व्यापारी आणि उत्पादकांनी आपला माल महाराष्ट्रात आणण्याऐवजी थेट गुजरात व इतर राज्यांकडे वळवला आहे. बाजारात मागणीच नसल्याने स्थानिक अडते आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ‘‘सध्या गूळ बाजारात आणू नका,’’ असे अधिकृत आवाहन केले आहे. परिणामी, रोज हजारोंच्या संख्येने होणारी गुळाची आवक आता शून्यावर आली आहे..गुऱ्हाळघरांना दर्जेदार गूळ निर्मितीची संधीदरम्यान, या संकटातून मार्ग काढण्यासाठी आता कोल्हापुरातील गूळ उत्पादक आणि गुऱ्हाळघर मालकांनी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेत पुन्हा पत निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी दर्जेदार गूळ निर्मितीची संधी म्हणून याकडे पाहिले जात आहे. रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे टाळून, केवळ दर्जेदार गूळ तयार करण्यासाठी उत्पादकांकडून विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी गुऱ्हाळघरांनी आता शेतातूनच चांगल्या प्रतीचा, कसदार ऊस आणण्यासाठी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधत खरेदी सुरू केल्याची माहिती गूळ उत्पादकांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.