Warna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dam : वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी

Rain Update : सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पावसाची उघडीप असून वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पावसाची उघडीप असून वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली असल्याने सांगली जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. गेल्या दोन दिवसांत पावसाने उघडीप दिली आहे. तसेच वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मंदावली असल्याने धरणातून सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.

धरणातून वक्रद्वारातून १०८८५ तर विद्युत गृहातून १४०० असा एकूण १२२८५ क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरण पाणलोट परिसरात २४ तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरलेला आहे, परंतु धरणातील आवक अजूनही ३८०१४ हजार क्युसेक असल्यामुळे ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग नदीत केला जात आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग स्थिर आहे. परिणामी, नदीच्या पाणी पातळीतील उतार हा संथ गतीनेच होत आहे. परंतु काही भागांत पाऊस सुरू असल्याने कऱ्हाड भागातील कोयना पूल, कृष्णा पुलाजवळ पाण्याच्या पातळी संथगतीने वाढत असल्याचे चित्र आहे.

सांगली येथील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २९) आयर्विन पुलाजवळ दुपारी बाराच्या सुमारास ३८ फूट ११ इंच पातळी होती. नदीच्या पाण्याची पातळी संथगतीने कमी होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदी काठच्या पूरपट्ट्यातील लोकांना दिसाला मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणी होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा, २१ ऑगस्टला सांगलीत मोर्चा

Sugarcane Machinery Subsidy: बिहारच्या ऊस उत्पादकांना मोठा दिलासा; कृषी यंत्रसामग्रीवर ८० टक्क्यांपर्यंत अनुदान

Hingoli Soybean Fraud : हिंगोलीत सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

Leopard Safe Zone: गिरणा पट्टा बिबट्यांसाठी ‘सेफ झोन’

Buldhana Name Change Demand: बुलडाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा : आमदार श्वेता महाले

SCROLL FOR NEXT