Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेला विसर्ग घटला

Ujani Water Storage : उजनी धरणात सध्या ११९.५० टीएमसी पाणीसाठा असून पूरनियंत्रणासाठी साडेतीन टीएमसीची जागा राखून ठेवली जात आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरणात सध्या ११९.५० टीएमसी पाणीसाठा असून पूरनियंत्रणासाठी साडेतीन टीएमसीची जागा राखून ठेवली जात आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ग्रीन अलर्ट असल्याने भीमा नदीतील विसर्ग साधारणतः: दहा हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे.

सध्या धरणावरील विद्युत प्रकल्पासह नदीतून सात हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून धरणातील अतिरिक्त पाणी भीमा नदीतून सोडून दिले जात आहे. त्या दिवसापासून धरणावरील विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू आहे.

त्याठिकाणी दररोज साडेतीन लाख युनिट वीज तयार होत आहे. धरणातून आतापर्यंत (एका महिन्यात) ७१ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. धरणात सध्या ५५.८४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात साडेतीन टीएमसी पाणी बसेल इतकी स्पेस तथा जागा राखून ठेवण्यात आली आहे.

अचानक पाऊस पडल्यास दौंडवरून एक लाख क्युसेकचा विसर्ग धरणात आल्यास पुढील सहा तासांत पूरनियंत्रणासाठी वेळ मिळू शकतो. सध्या उजनीत दौंडवरून नऊ हजार ७०० क्युसेकचा विसर्ग जमा होत असून तेवढेच पाणी धरणातून कालवा, कॅनॉल, उपसा सिंचन योजना, बोगद्यातून, नदीतून पाणी सोडून दिले जात आहे.

धरणातून सोडलेले पाणी

सीना-माढा उपसा सिंचन योजना २१० क्युसेक

दहिगाव उपसा सिंचन योजना ८० क्युसेक

बोगदा २०० क्युसेक

मुख्य कालवा १६०० क्युसेक

विद्युत प्रकल्प १६०० क्युसेक

भीमा नदीत ५३०० क्युसेक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT