Ujani Dam : सोलापुरकरांची चिंता मिटली; उजनी भरले; तर जिल्ह्यातील उर्वरीत सात धरणे भरण्याच्या वाटेवर 

Ujani Dam is full : यंदाच्या उन्हाळ्यात उजनी उणे ६० टक्क्यांवर पोहटले होते. तेच उजनी धरण आता १०३ टक्के भरले असून १ जूनपासून उजनी धरणात एकूण १३१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 
Ujani Dam
Ujani Damagrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने सोलापुरकरांसाठी वरदान असणारे उजनी धरण उणे ६० टक्क्यांवर गेले होते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस आणि पुण्याकडून होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. सध्या धरण १०३ टक्के भरले असून धरणात उपयुक्त पाणीसाठा १५.१७.२० टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी धरणात फक्त १३.५० टक्के पाणीसाठा होता. 

उजनी धरणामुळे जिल्ह्यातील खरीपाचे क्षेत्र वाढले असून सध्या जिल्ह्यात पावनेबारा लाख हेक्टरपैकी जवळजवळ पावनेदोन लाख हेक्टर क्षेत्राला उजनीचे थेट पाणी मिळते. तर जिल्ह्यातील ४५ हून अधिक साखर कारखाने उजनीवर अवलंबून असून येथे दीड लाख हेक्टरवर उसाची शेती केली जाते. तसेच सव्वालाखांहून अधिक हेक्टरवर फळबागा आहेत. तर सध्या उजनी शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’तून मुख्य कालव्याला २१०० क्युसेक पाणी सोडले

यंदा सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी भरण्यास मोठा हातभार लागला आहे. १ जूनपासून उजनी धरणात एकूण १३१ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरण १०० टक्के भरले असून ४ ऑगस्टपासून ३६ टीएससी भीमा नदी आणि कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले जात आहे. वीजनिर्मीती प्रकल्पासाठी धरणातून १६०० क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू असून सध्या उजनी धरणात दौंडवरून सहा हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे. तर सध्या धरणात ११८.६६ टीएमसी पाणीसाठा आहे. 

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणात तासाला १२ मेगावॅट विजनिर्मीती, ५ दिवसात १५ लाख युनिट वीज तयार

कॅनॉलला असणार १० ऑक्टोंबरपर्यंत पाणी

उजनी धरणातून भीमा नदी, वीजनिर्मितीप्रकल्पासाठी आणि उपसा सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. तर याचदरम्यान धरणातून कॅनॉलमध्ये सध्या २२०० क्युसेकने विसर्ग केला जात असून दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी १०५ आणि बोगद्यातून ९०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर हे पाणी १० ऑक्टोंबरपर्यंत सोडले जाणार असून याचा फायदा भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख ७ धरणे धरण्याच्या वाटेवर

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी सह जिल्ह्यातील प्रमुख ७ धरणे धरण्याच्या वाटेवर आहेत. यामुळे बळीराजा सध्या खूश असून वर्षभर पाणी शेतीला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार धोम बलकवडी या धरणात सध्या ९१.७० टक्के पाणीसाठा असून तारळी धरण देखील ९३.५८ टक्के भरले आहे. तर धोम धरणात सध्या ८६.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून कोयना धरण ८५.९४ टक्क्यांवर आले आहे. तसेच कण्हेर धरणात ८८.५६ टक्के पाणीसाठा असून उरमोडी धरण ९०.५० टक्के भरले आहे. वीर आणि भीमा (उजणी) धरण १०० टक्के भरले आहे. सध्या वीर धरणात २६६.४० (द.ल.घ.मी) पाणीसाठा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com