Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : धरणांनी गाठला जानेवारीतच तळ

Water Shortage : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच जानेवारीत धरणांनी तळ गाठला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच जानेवारीत धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील सुमारे आठहून अधिक धरणांत उपलब्ध पाण्याची पाणीपातळी शून्य टक्के झाली आहे.

यामध्ये उजनी, लोणावळा, खडकपूर्णा, सीना कोळगाव, शिसरमार्ग, किल्लारी, बोरगाव, अंजनपूर अशा धरणांचा समावेश आहे. येत्या काळात उर्वरित धरणेही कोरडी पडण्याच्या मार्गावर असून पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसींपैकी ८०६.६६ टीएमसी (२२८४८.७४ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गेल्या वर्षी याच काळात ८१.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी आहे. मागील काही वर्षांतील विचार करता हा जानेवारी महिन्यातील अत्यंत कमी पाणीसाठा असल्याचे बोलले जात आहे.

सध्या मराठवाड्यातील धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण असलेल्या ९२० धरणांत अवघा ८४.६७ टीएमसी म्हणजेच ३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच धरणांत ८१ टक्के पाणीसाठा होता.

यंदा मोठी घट झाली असून माजलगाव, रोशनपुरी, हिरडपुरी, मंगरूळ, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना या धरणांत वीस टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर काही धरणांत शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे.

नागपूर विभागातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणी आहे. एकूण असलेल्या ३८३ धरणांत १०४ टीएमसी म्हणजेच ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ७७ टक्के पाणी होते. अमरावती विभागातील २६१ धरणांत ८८.१९ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ८३ टक्के पाणी होते.

नाशिक विभागातील ५३७ धरणांत १२६.६९ टीएमसी म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ८६ टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागातील ७२० धरणांत ३१० टीएमसी म्हणजेच ५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ८१ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागातील १७३ धरणांत ९२.४५ टीएमसी म्हणजेच ७० टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ७८ टक्के पाणीसाठा होता.

मोठ्या प्रकल्पात ५८ टक्के पाणीसाठा :

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ६०३.३४ टीएमसी म्हणजेच सरासरी ५८.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ८५.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास २६.३७ टक्क्यांनी कमी पाणीसाठा झाला आहे.

यामध्ये नागपूर विभागात सध्या ७९.९० टीएमसी म्हणजेच ६५ टक्के, अमरावती विभागात ५३.३९ टीएमसी म्हणजेच ६३ टक्के, मराठवाड्यात ६१.२७ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के, नाशिक विभागात ८५.५१ टीएमसी म्हणजेच ६४ टक्के, पुणे विभागात २६०.९२ टीएमसी म्हणजेच ५९ टक्के, कोकण ६२.३२ टीएमसी म्हणजेच ६८ टक्के पाणीसाठा आहे.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरण --- एकूण क्षमता -- पाणीसाठा -- यंदाची टक्केवारी -- गतवर्षीची टक्केवारी

उजनी---११७.२१---०.३४--- उणे ०.६५ -- १००

कोयना---१०५.२४---७०.६९---७० --- ८२

जायकवाडी---१०२.६७---३१.२१--४० -- ८९

माजलगाव---१०.९८---०.६६---६ -- ८८

मांजरा---६.२५---१.०६---१७ -- ९३

निम्न दुधना---८.५४---१.४७---१७ --- ६५

बेंबळा---६.४९---२.७६--- ४२ --६८

मुळा ---२१.५०---१४.१७---६५ -- ९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT