Madh Mahotsav Agrowon
ॲग्रो विशेष

Madh Mahotsav : देशातील पहिला ‘मध महोत्सव’ भरणार महाराष्ट्रात

Honey festival in Maharashtra : देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा मध महोत्सव भरणार आहे. विशेषबाब म्हणजे हा महोत्सव महाराष्ट्रात भरणार असून तो १८ व १९ जानेवारीला मुंबईत भरवला जाणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Mumbai News : देशातील पहिल्या ‘मध महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असतील. हा महोत्सव मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारी दरम्यान भरणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

‘मध महोत्सव- २०२४’ च्या संदर्भात माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महोत्सवाचे कारण स्पष्ट करताना, साठे म्हणाले, देशातील मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाची माहिती लोकांना होण्यासाठी ‘मध महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करणारा महत्वाचा घटक असल्याचे साठे म्हणाले. तसेच मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. त्यामुळे याची पुर्ण माहिती या माध्यमातून लोकांना दिली जाणार आहे, असेही साठे यांनी सांगितले.

पुढे साठे म्हणाले, 'देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. त्यातूनच प्रेरणा घेऊन मध संचालनालय केंद्र शासनाने सुरू केल्याचे', साठे म्हणाले. मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून राबिवल्या जातात. तसेच माहिती व विक्रीसाठीही प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साठे यांनी दिली आहे.

माहिती व विक्रीसाठीही प्रदर्शन

यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या संकल्पना राबिवल्याचे साठे यांनी सांगितले आहे. तसेच पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठीही प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

किमान 20 स्टॉल

या पहिल्याच ‘मध महोत्सवा’त मधाबरोबर मध, मेणाचे उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT