Kolhapur Biroba Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Biroba Yatra : यंदा चांगला पाऊस, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, उलथा-पालथ होऊन भगवा फडकेल, फरांडे बाबांची भाकणूक

Kolhapur Biroba Yatra : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकडोली येथील ४०० वर्षांची पंरपरा लाभलेल्या विठ्ठल बिरदेव यात्रेला सोमवारपासून (ता.२१) सुरूवात झाली.

Aslam Abdul Shanedivan

Kolhapur News : बिरोबाच्या नावाने चांगभलच्या जयघोषात, ढोल-कैचाळाच्या निनाद आणि खारका-खोबऱ्यासह लोकरी आणि हळदीच्या भंडाऱ्याची उधळणीत कोल्हापूर येथील पट्टणकडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेला सोमवारपासून (ता.२१) सुरूवात झाली.

यावेळी राज्यासह, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून लाखो भाविक यात्रेत सहभागी झाले होते. तर यंदाच्या यात्रेत दगडी गादीवरून फरांडे बाबा यांनी यंदा चांगला पाऊस पडेल अशी भाकणूक करताना बळीराजाला सुखाचे दिवस येतील, राजकीय उलथा-पालथ होऊन राज्यात भगवा फडकेल असे म्हटले आहे.

लाखो भाविकांना उत्सुकता लागलेल्या फरांडे बाबा यांच्या भाकणुकीला दुपारी १ वाजता सुरूवात झाली. याआधी पंरपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडे बाबा यांनी अलिमगन देऊन भाकणुकीसाठी आमंत्रित केले. यावेळी फरांडे बाबा (Farande Baba) यांचा हेमाड सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

फरांडे बाबा यांची भाकणूक

यावेळी फरांडे बाबा यांनी हेमाड खेळत ढोल आणि कैताळाच्या निनादात मंदिराच्या गाभाऱ्यातून आले. यानंतर हळदीच्या भंडाऱ्याची उधळन करण्यात आली. यावेळी फरांडे बाबा यांनी पर्जन्य, धारण, राजकारण, भूमाता, बळीराजा, महासत्ता, हितसंबंध, रोगराई, रक्षण अशी विषयांना हात घालत भाकणूक केली.

फरांडे बाबा यांनी नऊ दिवस पावसाची कावड फिरेल, चालूवर्षी रोहिणी नक्षत्र बरसेल. यंदा पाऊस चांगला होईल. धारण चढती राहील, महागाई शिगेला पोहचेल. राजकारणात प्रचंड उलथा-पालथ होईल. भगव्याचे राज्य येईल. देशाची वाटचाल समान नागरी कायद्याच्या होईल.

बळीराजाला सुखाचे दिवस येतील. जग भारताकडे महासत्ता म्हणून बघेल. भारताचे संशोधन जगाच्या कौतुकास पात्र ठरेल. कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही. तर कोणीच कोणाच्या विश्वासास पात्र राहणार नाही.

रोगराई सर्वसामान्य असेल, देवाची सेवा करील त्याची रोगराई दूर होईल, मी स्वत: मेंढका होऊन हातात वेताची काठी घेऊन सेवा करणाऱ्या भक्तांचे रक्षण करीन, अशी भाकणूक फरांडे बाबांनी यंदा केली.

यात्रेस ४०० वर्षांचा इतिहास

राज्यासह विविध राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि ४०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या बिरदेव यात्रेस कोजागरी पौर्णिमेच्या मृग नक्षत्रावर सुरूवात झाली. यावेळी गाव चावडीत मानाच्या तलवारीचे मान्यवरांच्या हस्ते पूजा झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा उठाव वाढला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

Name Change Of Constituency : राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाच्या नावात बदल होणार

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड फायद्याची

Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!, जमा केले ऊस बिलापोटी प्रती टन ५० रुपये

SCROLL FOR NEXT