Water Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Agitation : बंधाऱ्यांना पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी बेमुदत धरणे

Water Issue : गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्चस्तर बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्चस्तर बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदावरी महामंडळासमोर किसान सभेच्या माध्यमातून बुधवार (ता. २१) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चेतून तोडगा न निघाल्याने हे धरणे आंदोलन गुरुवारी (ता. २२) सायंकाळी चारपर्यंत सुरूच होते.

परभणी जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. यातच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीवाटपाचे वेळापत्रक कोलमडले आहे. नादुरुस्त कालव्यांमुळे शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोचत नाही. बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावकऱ्यांनी केली आहे.

जालना जिल्हा परिषद, परभणी जिल्हाधिकारी आणि जायकवाडी विभाग क्र. २ यांनी देखील पाणीसाठा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. मात्र जायकवाडी प्रकल्पातील पाणी नियोजनात बंधाऱ्यात पाणीसाठा देण्याची तरतूद प्रारंभिक सिंचन अहवालात केलेली नाही. तसेच कालवा प्रचलन कार्यक्रमात देखील याचा समावेश केलेला नाही.

यामुळे जायकवाडी प्रकल्प डाव्या कालव्याचे पाणी देण्यात येत नाही. राजकीय दबावापोटी पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी येथील बंधाऱ्यात पाणीसाठा देण्यात आला. मात्र ढालेगाव बंधारा, मंगरूळ बंधारा, लोणी सावंगी बंधारा, तारूगव्हाण बंधारा, दिग्रस बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा देण्याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही.

असे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांसाठी गोदावरी सिंचनविकास महामंडळावर बेमुदत धरणे आंदोलन किसान सभा करीत आहे. यामध्ये कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड ओंकार पवार शेतकरी सहभागी झाले आहेत.

प्रमुख मागण्या...

ढालेगाव, मंगरूळ बंधाऱ्यात संपूर्ण पाणीसाठा द्या.

बंधारा लाभक्षेत्रात पाणी परवाने द्या.

ढालेगाव, मंगरूळचे व्यवस्थापन जायकवाडीत समाविष्ट करा.

जायकवाडी पाणी फेर नियोजनाचा १२ सप्टेंबर २०१८ शासन निर्णय रद्द करा.

कालवे दुरुस्तीसाठीचा थकित निधी तत्काळ द्यावा.

मुळी बंधाऱ्याचे दरवाजे दुरुस्तीची कामे पूर्ण करा.

बुडित जमिनीचा मोबदला द्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT