Water Agitation : बालगाव येथे पाण्यासाठी रक्तदान करत आंदोलन

Tukaram Baba Maharaj Protest : श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
Tukaram Baba Maharaj
Tukaram Baba Maharaj Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जत पूर्व भागातील ६५ गावांना पाणी द्या यासह अन्य मागण्यांसाठी चिक्कलगी श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या, म्हणत ५१ तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत अनोखे आंदोलन केले. पाण्यासाठी उमदी-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुरुवारी (ता. १) बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

Tukaram Baba Maharaj
Agriculture Produce : कृषिमाल विक्रीसाठी शेतकरी कंपन्यांशी करार

आंदोलकांनी आपली भूमिका मांडत शासन व प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली. जत पूर्व भागातील वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या, मायथळ कॅनॉलपासून गुडडापूर, अंकलगी, संख तलावात सायपन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येऊ शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे.

यासंदर्भात ठोस निर्णय घ्या, रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा, दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगीनंतर बालगाव येथे तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Tukaram Baba Maharaj
Cooperative Sector : सहकाराने केवळ साखर, दूध उद्योगात अडकू नये

तम्मणगौडा रविपाटील, बालगावचे सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अमित हिरेमठ, बोर्गीचे सरपंच शिवराज बिराजदार, हळळीचे सरपंच रवी मेडिदार, अक्कळवाडीचे उपसरपंच कांतू शेजाळे, उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे, सुनील पोतदार यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर आंदोलकानी थेट उमदी-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. शासन, प्रशासनाला पाणी देण्याची मागणी करत थेट ५१ जणांनी रस्त्यावर रक्तदान करत पाणी देण्याची मागणी केली. तुकाराम बाबांच्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com