Unprecedented Rains
Unprecedented Rains Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : तेलंगणातील शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

Team Agrowon

अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसून तेलंगणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नेहमीच्या धान्य पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचेही नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई (Compensation) देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली.

धान्य पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये आणि नगदी पिकांसाठी (Cash Crops) एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई (Compensation) देण्याची मागणी तेलंगणा रयतू संघम या संघटनेने केली.

राज्यात आतापर्यंत ६४ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून यातील १२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात ७ लाख हेक्टर क्षेत्रातील कापसाचे (Cotton) नुकसान झाल्याचे तेलंगणा रयतू संघमचे अध्यक्ष पी.सुदर्शन राव यांनी सांगितले.

कापूस लागवडीसाठी (Cotton Cultivation) शेतकऱ्यांना एकरी ८ हजार रुपयांचा खर्च आला होता. आता उर्वरित हंमागात त्यांना पुन्हा एकदा पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे, त्यामुळेच आम्ही तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी केली.

राज्यातील पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्येबाबतची प्राथमिक माहिती केंद्र सरकारला कळवण्यात आली. या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आर्थिक मदतीची विनंती करण्यात आल्याचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले.

राज्यातील पूर आणि अतिवृष्टीने राज्यातील एकूण नुकसानीचा आकडा सुमारे १४०० कोटींवर गेला. रस्ते व गृहनिर्माण विभागाने ४९८ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे म्हटले. पंचायत राज विभागाने आपल्या विभागातील नुकसानीचा आकडा ४५० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला असून महानगर प्रशासन विभागाने ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कयास व्यक्त केला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्यांवर पाणी फिरले. आता दुबारच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ खते, बियाणे, किडनाशके उपलब्ध करून देण्याची मागणी तेलंगणा रयतू संघमचे सरचिटणीस टी. सागर यांनी केली.

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त परिसराची पाहणी

दरम्यान शुक्रवारी (२२जुलै) केंद्रीय पथकाने राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. केंद्रीय वित्त विभागाचे उपसचिव पार्थिबन, केंद्रीय जल आयोगाचे संचालक रमेश कुमार, केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक के. मनोहरण, नॅशनल हायवे ॲथॉरिटीचे ज्येष्ठ अभियंते शिवकुमार कुशवाह यांच्या पथकाने भद्रादी कोथागुडेम, निर्मल, आदिलाबाद जिल्ह्यांतील क्षतीग्रस्त ठिकाणा भेट देऊन स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT