Cotton Procurement: धुके आणि अलिकडे झालेल्या पावसामुळे कापसातील अधिक ओलावा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यंदाच्या हंगामात कापसातील अधिक ओलाव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ओलाव्याबाबत असलेले निकष शिथिल करावेत आणि भारतीय कापूस महामंडळाला (CCI) २० टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे..येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कारण त्यांच्यापैकी जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांहून कमी भाव मिळत आहे. कापसाची किमान आधारभूत किंमत (MSP) ८,११० रुपये आहे. पण एमएसपीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे..Cotton MSP Procurement : पावसामुळे कापसाचा १२ टक्के ओलावा टिकवणे अवघड.परवानगी असलेल्या ८ टक्क्यांहून अधिक ओलाव्यात प्रत्येकी एक टक्का वाढ आढळून आल्यास भारतीय कापूस महामंडळाकडून 'एमएसपी'तून प्रतिक्विंटल ८१ रुपये रक्कम वजा केली जाते. ही बाब शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे..सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी १२ टक्क्यांहून अधिक ओलावा असलेला कापूस खरेदी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पीक तीन ते चार दिवस वाळवल्यानंतरही ते बाजारात आणण्यापूर्वी ओलाव्याची पातळी २० टक्क्यांच्या जवळपास राहते..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र.या प्रश्नी सोमवारी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदिलाबाद बाजार समितीत निदर्शने केली. त्यांनी खरेदी प्रक्रिया बंद पाडली. कापसातील ओलाव्याची पातळी विचारात न घेता सीसीआयने त्यांचा शेतमाल खरेदी करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आमच्या मागणीचा विचार करावा, अन्यथा खासगी व्यापाऱ्यांना कमी किमतीत प्रतिक्विंटल सुमारे ६,९०० रुपये दराने कापूस विकावा लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .शेतकऱ्यांच्या निदर्शनानंतर, स्थानिक आमदार पायल शंकर आणि जिल्हाधिकारी राजर्षी शाह यांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी खासगी जिनिंग मिल मालकांशी चर्चा केली आणि त्यांना ओलाव्याची पातळी विचारात न घेता प्रतिक्विंटल ६,९५० रुपये दराने कापूस खरेदी करण्याबाबत पटवून दिले..तरीही, शेतकऱ्यांना हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटलमागे सुमारे १ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढण्यापूर्वी खासगी व्यापारी कमी किमतीत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करत आहेत. व्यापारी सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचे शेतकरी सांगतात..हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस आधीच विकलेला असतो. तेव्हा खासगी व्यापारी आणि सीसीआय ८ टक्के ओलाव्यासह कापसासाठी जास्त भाव देऊ करतात..अनेकवेळा शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी सीसीआयने सुरू केलेल्या कपास किसान अॅपवर स्लॉट बुक करणे शक्य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल स्वस्त दरात खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. यामुळे कापूस खरेदी प्रक्रियेत या अॅपचा उद्देशच निष्फळ ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.