PM SaurGram Inaguration Agrowon
ॲग्रो विशेष

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Solar Village : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमा नदीतीरावर डोंगराच्या दुर्गम भागाच्या कुशीत वसलेल्या टेकवडी (ता. खेड) गावचे सरपंच विठ्ठल शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे टेकवडी गाव राज्यातील दुसरे आणि पुणे जिल्ह्यातील पहिले पीएम सौरग्राम म्हणून आता ओळखले जाणार आहे.

Team Agrowon

Pune News : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमा नदीतीरावर डोंगराच्या दुर्गम भागाच्या कुशीत वसलेल्या टेकवडी (ता. खेड) गावाची लोकसंख्या अवघी १२३४. या गावचे सरपंच विठ्ठल शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे टेकवडी गाव राज्यातील दुसरे आणि पुणे जिल्ह्यातील पहिले पीएम सौरग्राम म्हणून आता ओळखले जाणार आहे. तर मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सौरग्राम टेकवडी मधील १०० टक्के सौर ऊर्जा प्रकल्पांचे नागपूर येथून ‘ऑनलाइन’द्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गाव पर्यावरण पूरक, हरितग्राम करण्यासाठी खेड रोटरी क्लबच्या मदतीने गावात ४०० झाडे लावून संवर्धन सुरू आहे. स्वच्छ, सुंदर गाव करण्यासाठी गावातील प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसून येतो.गावाने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये खेड महावितरण अधिकाऱ्यांनी टेकवडीमध्ये पीएम सौरग्राम योजना राबविण्याबाबत सरपंच विठ्ठल शिंदे आणि ग्रामस्थ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सौर ऊर्जा योजना व फायदे समजून सांगण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने होकार देत सौरग्रामसाठी तयारी सुरू केली. फोरविया फाउंडेशन कंपनीच्या माध्यमातून तब्बल ६६ लाखांचा सीएसआर निधी खर्च करून १०० टक्के सोलर युनिटची निर्मिती करण्यात आली. गावातील ७० घरांसाठी प्रत्येकी एक किलोवॉटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच उर्वरित ग्रामपंचायतीच्या २ तसेच मंदिर व प्राथमिक शाळेसाठी प्रत्येकी ७ किलोवॉटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले.

सौर प्रकल्पामुळे मिळणारे फायदे...

गावाला सौर प्रकल्पांमुळे तब्बल ९८ किलोवॉट वीजनिर्मितीची क्षमता प्राप्त.

गावात प्रत्येक महिन्यात तब्बल ११ हजार ७६० युनिट वीजनिर्मिती.

सर्व ७० घरांचा दरमहा सरासरी वीज वापर ७० ते ८० युनिट

सर्वच घरांवर प्रत्येकी एक किलोवॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित.

प्रत्येक घरासाठी दरमहा १२० युनिट वीजनिर्मिती.

सर्व घरांसह इतर वीजजोडण्यांचे वीजबिलदेखील यापुढे शून्य होणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production Issue: उशिराच्या लागवडीमुळे हळदीच्या उत्पादकतेत घट शक्य

Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

Employment Support: मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना नोकरी; वनमंत्री गणेश नाईक यांची सभागृहात घोषणा

Maharashtra Assembly Session: मंत्रिपदासाठी नाही, मग कर्जमाफीसाठी निकष का?

Anna Hazare Protest: पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT