Solar Village : खेडमधील टेकवडी ठरले राज्यातील दुसरे सौरग्राम

Tekwadi Village : राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून पुणे जिल्ह्यातील टेकवडी (ता. खेड) गावाने मान पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौरऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरू झाला आहे.
Solar Village Honor
Solar Village HonorAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून पुणे जिल्ह्यातील टेकवडी (ता. खेड) गावाने मान पटकावला आहे. १ हजार २३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौरऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरू झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौरऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यामध्ये मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) नंतर राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून टेकवडी गावाने एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.

ऊर्जामंत्री फडणवीस यांच्याहस्ते सौरग्राम टेकवडीमधील १०० टक्के सौर ऊर्जाकरण प्रकल्पांचे ‘ऑनलाइन’द्वारे लोकार्पण करण्यात आले. नागपूर येथे बुधवारी (ता. ९) आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले.

Solar Village Honor
Western Maharashtra Solar : पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

कार्यक्रमाला ‘ऑनलाइन’द्वारे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि टेकवडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. तर व्यासपीठावर आमदार अॅड. आशिष जयस्वाल, डॉ. परिणय फुके, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन) अरविंद भादिकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती.

Solar Village Honor
Solar Power System : राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जाकरणावर

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते ‘सौरग्राम’चे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सरपंच विठ्ठल शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग यांनी स्वीकारले. या वेळी फोरविया फाऊंडेशनचे ओंकार साळवी, सौर प्रकल्पाचे कंत्राटदार मुकेश माळी यांचाही गौरव करण्यात आला.

पुणे परिमंडल अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमा नदीच्या तिरावर टेकवडी गावामध्ये घरगुती ७०, ग्रामपंचायतीच्या २ तसेच मंदिर व शाळेसाठी प्रत्येकी एक अशा ७४ वीजजोडण्या आहेत. या सर्वच वीजजोडण्या सौरऊर्जेवर नेण्यासाठी टेकवडीची निवड करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com