Solar Power Project
Solar Power Projectagrowon

Solar Power Project : शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी, ९०० मेगावॅट ‘सौर’ ऊर्जा प्रकल्प

Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरु आहे.
Published on

Solapur News : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरु आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली आहे.

यातून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा शाश्वत वीज पुरवठा होणार असल्याने वेगाने उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

Solar Power Project
Solar Pump : ‘शेतकऱ्यांना सौर कृषिपंप पावसाळ्यात मिळणार का?’

तसेच ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील. त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहितीही नाळे यांनी दिली.

Solar Power Project
Solar Drying : सौर वाळवणी यंत्रणा फायदेशीर

१७० वीज उपकेंद्रे जोडणार

पश्चिम महाराष्ट्रातील ७०७ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५ हजार ८७७ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत ५ हजार ३४४ एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यामध्ये प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ मेगावॅट, सांगली - ३२ उपकेंद्रांसाठी २०७ मेगावॅट, कोल्हापूर- ४४ उपकेंद्रांसाठी १७० मेगावॅट, पुणे - ४१ उपकेंद्रांसाठी २३४ मेगावॅट आणि सोलापूर जिल्ह्यातील १४ उपकेंद्रांसाठी ८१ मेगावॅट असे एकूण १७० उपकेंद्रांसाठी ९०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीकडून सुरू झाले आहेत, असेही नाळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com