Urad Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Urad Cultivation : उडीद लागवडीचे तंत्र

Urad Farming : उडीद हे पीक ७० ते ८० दिवसांत पावसावर येणारे पीक आहे. मिश्र पीक पद्धतीसाठी अतिशय महत्त्वाचे पीक आहे. लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी.

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

Urad Production : उडीद हे पीक ७० ते ८० दिवसांत पावसावर येणारे पीक आहे. मिश्र पीक पद्धतीसाठी अतिशय महत्त्वाचे पीक आहे. लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमिनीमध्ये लागवड करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजेच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी.

उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणी ७ जुलैनंतर करू नये. पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी. पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी. ठेवावे. तुरीचे आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या तीन ओळी नंतर एक ओळ तुरीची पेरणी करावी.

हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रक्रिया करावी. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम पीएसबीची प्रक्रिया करावी.

पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. तसेच शेंगा भरत असताना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम डीएपी प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. फुले येताना आणि शेंगा भरताना पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा कमी झाला तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे, दोन टक्के युरियाची फवारणी करावी.

सुधारित जाती

टीएयू-१

कालावधी : ६५-८० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे दाणे, रोपावस्थेत जोमदार वाढ, एकाच वेळी पक्वता, भुरी रोगास मध्यम प्रतिकारक.

उत्पादन : १०-१२ क्विं/हे.

ऐकेयू १५

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे दाणे, एकाच वेळी पक्वता, भुरी रोगास मध्यम प्रतिकारक

उत्पादन : १०-१२ क्विं/हे.

पीकेव्ही ब्लॅक गोल्ड

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम दाणे,भुरी रोगास मध्यम प्रतिकारक.

उत्पादन : १०-११ क्विं/हे.

एनयुएल - ७ (विश्वास)

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : भुरी व पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक.

उत्पादन : १०-११ क्विं/हे.

फुले वसू

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे दाणे,भुरी व पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक. अवर्षणप्रवण क्षेत्रात लागवडीसाठी योग्य.

उत्पादन : ८-१० क्विं/हे.

फुले राजन

कालावधी : ७५-८० दिवस

वैशिष्ट्ये : चमकदार टपोरे दाणे, भुरी पिवळा विषाणू रोगास सर्वसाधारण प्रतिकारक.

उत्पादन : ८-१० क्विं/हे.

आंतरपीक

उडीदाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीची जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी उडदाची काढणी पूर्ण होते. कापूस + उडीद (२:१), उडीद + ज्वारी ( २:१) इत्यादी आंतर पीक पद्धतीचा अवलंब करता येतो.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Fishing Season: सिंधुदुर्गात मासेमारी हंगाम सुरू

Education For All: समाजमंदिरे बनली ज्ञानमंदिरे

SCROLL FOR NEXT