Urad Dal
Urad DalAgrowon

Healthy Urad : आरोग्यदायी उडीदडाळ

Urad Food : उडीद डाळीमध्ये तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. याचा पचनासाठी फायदा होतो. बद्धकोष्ठता, अतिसार, गोळा येणे कमी करण्यास मदत करते.
Published on

कृष्णा काळे

Agriculture News : उडीद डाळीमध्ये तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. याचा पचनासाठी फायदा होतो. बद्धकोष्ठता, अतिसार, गोळा येणे कमी करण्यास मदत करते. डाळीमधील तंतुमय घटक पोषक तत्त्वांचे शोषण सुधारण्यास मदत करतात.

उडीदडाळीमध्ये लोहाचे चांगले प्रमाण असते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये लोह हा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे हातपायांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाह वाढतो तसेच ऊर्जा वाढते. लोहामुळे अशक्तपणावर मात करता येते.

Urad Dal
Urad Farming : व्यवस्थापनातून वाढविली उडदाची उत्पादकता

उडीदडाळीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह आणि मॅग्नेशिअम यांसह मोठ्या प्रमाणात खनिजे असतात. जसजसे आपण वय वाढते तसतशी आपली हाडे, सांधे कमकुवत होतात. यामुळे संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिसचा त्रास वाढतो. त्यामुळे दैनंदिन आहारात उडीद डाळीचा समावेश केल्यास हाडे, सांधे लवचिक राहातात.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी उडीद डाळ फायदेशीर आहे. आतड्यांमधील पोषक द्रव्यांचे शोषण नियंत्रित करण्यासाठी तंतूमय घटक महत्त्वाचे आहेत. यामुळे रक्तातील इन्शुलिन आणि ग्लुकोजची पातळी संतुलित होते. रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ थांबविता येते.

Urad Dal
Urad Production : पावसाच्या खंडामुळे उडदाच्या उत्पादकतेत घट

आयुर्वेदिक उपचारामध्ये उडीद डाळीपासून बनवलेल्या पेस्ट सनबर्न, टॅन तीव्रता आणि मुरमांची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. शरीरात वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी, उडीद डाळ हा आयुर्वेदिक उपाय आहे.

खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे मिश्रण चयापचय वाढवण्याव्यतिरिक्त आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. वेदनादायक भागांच्या दुखापतीच्या सांध्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.

उडीदडाळीमधील तंतुमय घटक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांचे मिश्रण तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करण्यासाठी तंतूमय घटक फायदेशीर आहेत. पोटॅशिअम रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करते.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com