Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी आता भरारी पथके

Agriculture News : या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Team Agrowon

Akola News : कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली असून ठिकठिकाणी होणाऱ्या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तपासणीत कुठेही हयगय होता कामा नये, तसेच कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

कृषी विभागातर्फे खरीप निविष्ठांच्या संनियंत्रणासाठी यापूर्वीच पथके स्थापन केली आहेत. तथापि, कपाशी बियाण्याच्या ठराविक वाणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.

या पथकांद्वारे कृषी निविष्ठांच्या विक्रीवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांचा पथकात राहणार आहे. या पथकांकडून जिल्हाभरात तत्काळ तपासणी व कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना बियाणे, खताचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठेही कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री होता कामा नये. अत्यावश्यक वस्तू कायदा, बियाणे कायदा व नियम, बियाणे नियंत्रण आदेश, खत नियंत्रण आदेश, कीटकनाशके कायदा व नियम, तसेच कृषी आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी व्हावी व वेळोवेळी कार्यवाहीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT