Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Agriculture Seeds and Input Sales : बियाणे, निविष्ठा विक्रीवर राहणार कृषी विभागाच्या पथकांची नजर

Agriculture Department : या खरीप हंगामात बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता, गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Akola News : या खरीप हंगामात बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता, गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दुकानांवर हे कर्मचारी दैनंदिन उपस्थित राहत आहेत.

Agriculture Department
Climate Changes : बदलत्या हवामानात लागवड तंत्रही बदला

छापील विक्री किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, विशिष्ट वाणांच्या बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे किंवा एका वाणासोबत इतर वाणाचे बियाणे किंवा निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडणे या बाबी कदापिही घडता कामा नये, अशा स्पष्ट सूचना पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिल्या आहेत. अधिकृत बी. टी. कापूस बियाणे वाणाचे वितरण व विक्री ही परवानाप्राप्त अधिकृत विक्री केंद्राद्वारे व बियाणे वेष्टनावरील छापील किमतीच्या मर्यादेतच होणे अनिवार्य आहे.

निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार घडू नये म्हणून कृषी सेवा केंद्रांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी केंद्रावरील प्राप्त साठा व विक्री होत असलेला साठा नियमितपणे तपासण्याचे व गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : नगर जिल्ह्यात तीन कृषी निविष्ठा परवाने कायमस्वरूपी रद्द

अकोला येथे ॲग्रो असोसिएट व शाह एजन्सी येथे राजेंद्र पातोंड, बाहेकर अँड कंपनी येथे प्रणीत बंड, मराठा कृषी केंद्र येथे उमेश हिवाळे, स्वाती सीड्स येथे चंद्रकांत नावकार, संजय कृषी सेवा केंद्र येथे संतोष मुळे, आपातापा येथे अनिल वानखडे, बोरगाव मंजू येथे अजय देशमुख, दहिहांडा येथे नितीश घाटोळ, कापशी येथे धमेंद्र राठोड असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

विशिष्ट वाणांसाठी रांगा

बीटी कपाशी बियाण्यांच्या विशिष्ट वाणांची बाजारपेठेत कमतरता असून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी करीत आहेत. या बियाणे कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांच्या प्रतिष्ठांनासमोर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. १६ मे पासून शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे विक्री सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी अकोल्यात काही दुकानांसमोर रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. कृषी विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारीही यावेळी हजर होते. संबंधित वाणाची जाणीवपूर्वक टंचाई निर्माण केली जात असल्याने दर वर्षी अशा रांगा लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com