Tur Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Pest Control : तुरीवरील कीड नियंत्रणासाठी उपाययोजना करा

Tur Pest Management : शेंगा पोखरणारी अळी ही बहुभक्षी कीड असून हेलिकोव्हर्पा नावाने ओळखली जाते. एका अळीपासून साधारणत: ७ ते १६ शेंगाचे नुकसान होते.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून सतत ढगाळ वातावरण व पाऊस तसेच सकाळी धुके पडते आहे. त्यामुळे तूर पिकावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या मुख्य किडींचे निरीक्षण करा, त्यांची ओळख करून त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.

शेंगा पोखरणारी अळी ही बहुभक्षी कीड असून हेलिकोव्हर्पा नावाने ओळखली जाते. एका अळीपासून साधारणत: ७ ते १६ शेंगाचे नुकसान होते. पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असून त्यावर विविध रंगछटा आढळतात.

आर्थिक नुकसान पातळी एक मिटर रांगेत ३ ते ५ अळ्या किंवा १० ते २० अळ्या प्रति १० झाडे असतात. यासाठी नियंत्रणाकरीता १.५ टक्के निंबोळी अर्क अथवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस.जी. ३ ग्रॅक किंवा कोरनॅन्ट्रॅनिपॉल १५.५ एस.सी. २.५ मिली. १० लिटर पाण्यात येऊन

फवारावे.तुरीवरील पिसारी पतंग अळी ही हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकाकडे निमुळती होत गेलेली असते. पाठिवर काटेरी लव असतात. लहान अळया फुले शेंगांना छिद्र पाडून दाणे खातात.

अळी शेंगाच्या आत कधीच शिरत नाही. नियंत्रणासाठी पिसारी पतंगाच्या ५ ते १० अळया प्रति १० झाडे आढळून आल्यास मोनोग्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ११ मिली १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे.

माशी अळी पांढऱ्या रंगाची असून गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी पूर्ण विकसित झाल्यानंतर शेंगाला छिद्र पाडून बाहेर पडते.

ही अळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. अळी दाणे कुरतडून खात असल्यामुळे दाण्याची मुकणी होते. नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा मानोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल ११ मिली अधिक १० लिटर पाणी घेऊन फवारावे.

प्रत्येक फवारणी करताना बुरशीनाशक कार्बनडायझिन किंवा प्रापॅकोनोझॉल टाकून फवारणी केल्यास शेंगा/पानावरील करपा रोगाचे नियंत्रण करता येते. हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे व हेलिकोव्हर्पाचे ल्यूर्स लावावे. जेणेकरून या किडीचे नर पतंग आकर्षि‍त होऊन काही प्रमाणात नियंत्रण होण्याबरोबरच किडीची तीव्रता समजल्यामुळे योग्यवेळी फवारणी करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT