Small Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Small Industry Training : लघुउद्योग प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या

Registration of Small Entrepreneurs : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लघुउद्योग प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ७२५ लघुउद्योजकांची नोंदणी झाली आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लघुउद्योग प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ७२५ लघुउद्योजकांची नोंदणी झाली आहे. आगामी काळात सुमारे ८ हजार लघुउद्योजक निर्माण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

खुल्या प्रवर्गातील कुठल्याही शासकीय विभाग, योजना, महामंडळे, उपक्रम यांच्याकडून लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाने ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केलेली आहे. लघुउद्योजक प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १ हजार ७२५ लघुउद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातील कृषी आधारित लघुउद्योगांचे १९० लाभार्थी आहेत.

लाभार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान आंतरवासिता (इंटर्नशिप), व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, लाभार्थ्यांना बँकिंग व वित्तीय संस्थांमार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी साह्य व मार्गदर्शन, व्यवसाय प्रसिद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, उद्यम नोंदणी आणि प्रकल्प भेटीद्वारे साह्य आदीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा खुल्या प्रवर्गातील असावा. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवाराला ‘अमृत’च्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.

अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जागेबाबतचा पुरावा तसेच कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. अधिक माहितीसाठी ‘अमृत’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त ‘ध्रुव ॲकॅडमीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अमृत’च्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT