Agriculture Electricity : शेतीला वीजपुरवठ्यासाठी वीस हजार कोटींचे कर्ज मंजुर

Fund for Agriculture Electricity : कृषी वाहिन्याचे सौरऊर्जाकरणासाठी आशियायी पायाभूत गुंतवणूक बँकेकडून ९०२० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास बुधवारी (ता. १३) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Agriculture Power Supply
Agriculture Power SupplyAgrowon

Mumbai News : शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेली वीज प्रणाली विकसित करण्याबरोबरच पारंपरिक पद्धतीने वीज जोडण्या देण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून ११ हजार ५८५ कोटी तसेच कृषी वाहिन्याचे सौरऊर्जाकरणासाठी आशियायी पायाभूत गुंतवणूक बँकेकडून ९०२० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास बुधवारी (ता. १३) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अडचणी विचारता घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत. २०२३ पर्यंत ३० टक्के कृषी वीज वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्यासाठी सुमारे सात हजार मेगावॉट विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.

Agriculture Power Supply
Agriculture Electricity : विजेअभावी सुकणार नाहीत पिके

राज्यात सध्या एक ते सव्वा लाख कृषिपंपांची दरवर्षी मागणी असते. त्यामुळे सौरऊर्जाकरण आणि नवीन वीज जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण सक्षमीकरण आणि सौर कृषी वीज जोडणी ऊर्जाकरण या योजनेसाठी आशियायी विकास बँकेकडून कर्जाऊ रक्कम उभी करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. या योजनाचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकाराच्या मान्यतेसाठी केंद्रीय वित्त विभागाला पाठविण्यास मान्यता देण्यात आली.

ही योजना महावितरणामार्फत राबविण्याकरता सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्प किमतीच्या ३० टक्के म्हणजे २२०० कोटी व्यवहार्य निधी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्याकरिता ७६०० कोटी, शेतीपंपांचा पारंपरिक पद्धतीने वीज जोडणीदेण्यासाठी १ हजार कोटी, एससएडीए प्रणालीकरिता ६०० कोटी प्रायोगिक तत्त्वावर बॅटरी एनर्जी स्टोअरेजसाठी १५० कोटी आणि प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी अशा ११ हजार ५८५ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेतील ८१०९ कोटी रुपयांचा निधी खुल्या बाजारातून आशियाई विकास बँकेकडून बाजार भावाच्या व्याजदराने उभारण्यात येणार आहे.

Agriculture Power Supply
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या पाच हजार नव्या वीज जोडण्या रखडल्या

सौरऊर्जाकरणासाठी ९०२० कोटींचे कर्ज

पारेषणविरहित सौर कृषिपंप वितरित करण्याबाबत तसेच कृषी वाहिनींचे सौरऊर्जाकरणासाठी सलग्न योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ९०२० कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. हे कर्ज खुल्या बाजारातून आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेद्वारे उभा करण्यात येणार आहे.

प्रचलित व्याजदराने हे कर्ज घेण्यात येणार असून, या योजनेसाठी ४ हजार ८१७ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी २०२८ या वर्षाच्या अर्थसंकल्पी तरतुदीतून उभारण्यात येणार आहे. एआयआय बँकेकडून दोन टप्प्यांत कर्ज घेण्यात येणार असून पहिल्यांदा १३ हजार ४९३१ कोटी ५६ लाख, तर दुसऱ्यांदा १५४५ कोटी २५ लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली.

योजनेची उद्दिष्टे

कृषिपंप ग्राहकांना दिवसा अखंडित व वीजपुरवठा करणे.

कृषिपंपांकरिता लागणाऱ्या विजेची पूर्तता अपारंपरिक स्रोतांद्वारे निर्माण होणाऱ्या विजेने करणे.

मुख्यमंत्री सौरऊर्जाकरण २ योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासबंधी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचे सक्षमीकरण करणे.

पाच लाख शेतीपंपांना कालबद्ध कार्यक्रमानुसार पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देणे.

३३/११ केव्ही लघुदाब वाहिनीची पायाभूत सुविधा निर्माण करणे.

विकेंद्रित अक्षय ऊर्जा निर्माण करून गळती रोखणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com