Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : खते, बियाण्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

Team Agrowon

Beed News : बीड जिल्ह्यात कुणी खते आणि बियाणे यांची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असेल किंवा चढ्या दराने विक्री करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाणी व चारा स्थिती तसेच खरिपाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री मुंडे यांना यांनी शनिवारी (ता. ८) घेतला. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाले.

श्री मुंडे म्हणाले, की शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि पीक कर्ज यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाला निर्देश दिले आहेत. बीड जिल्हा फार्मर-आयडी मध्ये देशात अव्वल आहे. या फार्मर -आयडीच्या आधारे जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे.

त्याचा लक्षांक वाढवून आता १ लाख पर्यंत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १,७०७ कोटी रुपये कर्ज वाटपाचे नियोजन आहे. यात ४० टक्के वाटा हा ग्रामीण बँकेचा राहील. त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक देखील आता सक्षम झाली असून त्या बँकेद्वारे ही कर्ज वितरण यंदा होणार आहे. पीक कर्ज नव-जुने करताना नवे कर्ज वाटप करणे, त्यासोबतच नव्याने ज्यांनी कर्ज घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जवाटप होईल.

राष्ट्रीयकृत बँकांचा यात मोठा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. ई- केवायसी आणि थंब इम्प्रेशनच्या आधारे या बँका जिल्ह्यात १८० ठिकाणांवरून रॅली काढून १८० गावात तत्काळ वितरण करण्याचे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आले आहे.मनरेगांची कामे तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

चारा डेपो सुरु करण्याच्या सूचना

पाणीटंचाई बाबत जिल्ह्यात फारशा तक्रारी नाहीत. काही प्रमाणात चारा टंचाईच्या तक्रारी आहेत. याची दखल घेऊन ज्या ठिकाणी जादा पशुधन आहे, अशा ठिकाणी चाऱ्याची उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच गरज असणाऱ्या मंडळाच्या ठिकाणी चारा डेपो १० दिवसात सुरू करा, अशा सूचना श्री मुंडे यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT