Agriculture Fertilizers : खतांचा २.२१ लाख टन पुरवठा मंजूर

Fertilizers Approved : खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचा एकूण २.२१ लाख टन पुरवठा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

Nashik News : खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचा एकूण २.२१ लाख टन पुरवठा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता १७ भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड यांनी दिली आहे.

जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग व उडीद आदी पिकांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे. खरीप हंगाम २०२४ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचा एकूण २.२१ लाख टन पुरवठा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

Fertilizer
Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

२७ मे २०२४ अखेर जिल्ह्यात युरिया खत ५५३७२ टन, डीएपी ११९५१ टन, एमओपी २३६१, एसएसपी १३९५८ टन व संयुक्त खते ८३३८६ टन असे एकूण १६७०२८ टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांची माहिती ‘कृषिक’ या मोबाइल अॅपवर ‘चावडी’ या सदराखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे/पिशव्या/बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकऱ्यांनी परवानाधारक केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात.

Fertilizer
Agriculture Fertilizer : बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी १.७७ लाख टन खत मंजूर

अनुदानित रासायनिक खताची खरेदी ई-पीओएस मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटावरच्या छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरीक्त इतर निविष्ठांची सक्ती करणे बेकायदा असून याबाबत कृषी विभागाकडे, वजनेमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी.

तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी १ आणि तालुकास्तरावर प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी.

कृषी निविष्ठांबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर कार्यरत कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com